बीड क्राइम न्यूज: “मिनी आत्मकथन हॅनू हॅनूला जावे”, पत्रकार, अंडरवर्ल्डची कमजोरी? हत्येच्या छायाचित्रांमध्ये यशला उशीर झाला
बीड: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बीड शहरासह आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणावर गुन्ह्याच्या अनेक घटना घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची निर्घृण हत्या केली होती. हत्येची ही घटना उघडकीस येताच संपूर्ण महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटले. राजकीय वातावरण देखील तापलं होतं, मात्र अजूनही येथील गुन्हेगारीच्या घटना कमी झालं नसून वारंवार अशा घटना घडत आहेत. गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास भर चौकात एका तरूणाच्या हत्येच्या घटनेनं बीड हादरलं. बीडमधील स्थानिक पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाका (yash dhaka) याची त्याच्या मित्रानेच चाकुने वार करत निर्घृणपणे हत्या केली. महिनाभरापूर्वी वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादातून यशची हत्या केल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.(yash dhaka photo with walmik karad)
यास डंका फोट्स व्हिट्स Wrmink कराड: तो एक छायाचित्रकार होता
मृत तरुण यश ढाका याचं नाव आता वाल्मीक कराडशी जोडले जात आहे. यशचा एक जुना फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, या फोटोमध्ये तो संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडसोबत एका कार्यालयात उभा असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे, या फोटोला एडिट करून जोडलेला डायलॉग सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. या फोटोला एडिट करून लावलेला डायलॉग मात्र आता सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे. यश ढाका याच्या फोटोला एडिट करून “मैं अपने आप को पुलीस के हवाले कर रहा हू, अपने पैसे, अपने दबदबे, अपने बल से.. मैं तो छूट जाऊंगा लेकिन तेरा क्या होगा मेरे दोस्त, तेरा क्या होगा?” अशा प्रकारचा डायलॉग यशच्या फोटोला जोडण्यात आला आहे. त्याचा हा फोटो आणि डायलॉग सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतं आहे.
गुन्हेगारीच समर्थन नाहीच टोळी कोणाची हे शोधावंचं.. त्यांना शिक्षा व्हावी.. 💯@BeedPolice
सोज्वळ पत्रकाराचा सोज्वळ मुलगा..!?
👇🏻#एएम https://t.co/fngrn5dnu3 pic.twitter.com/bl6inmkd9k– अमोल अस्वाले (@अमोलासवाले 7) 26 सप्टेंबर, 2025
yash dhaka Case: नेमकं प्रकरण काय?
बीड शहरातील एका चौकामध्ये यश देवेंद्र ढाका या तरुणाची रात्री हत्या (Beed Crime News) करण्यात आली. या हत्येमागचं कारण मित्रासोबत वाढदिवस साजरा करताना वाद झाला वादातून दोघांमध्ये वैर निर्माण झालं आणि त्यातूनच यशचा मित्र सुरज काटे याने धारदार शस्त्राने वर्दळीच्या ठिकाणी पोटात चाकूने वार करून यशचा (Beed Crime News)खून केला. महिन्याभरापूर्वी यश आणि सुरज या दोघांमध्ये वाढदिवस साजरा करताना भांडण झाले. त्यामुळे त्यांच्यात वैमनस्य निर्माण झाले आणि यातूनच यशची हत्या झाल्याचे कारण समोर आले आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ एका आरोपीला अटक केली आहे. मात्र सीसीटीव्हीच्या आधारे आणखी या हत्येत इतरांचा समावेश होता का? याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय.(Beed Crime News)
२२ वर्षीय यश हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा तो मुलगा. ही घटना बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात घडली. छातीत झालेले दोन वार आरपार गेल्याने यश ढाका रक्तबंबाळ झाला होता. जखमी अवस्थेत त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.
आणखी वाचा
Comments are closed.