राष्ट्रवादीसोबत कधीही युती करणार नाही, आम्ही एकला चलो च्या भूमिकेत, रायगडमध्ये महायुतीत ठिणगी


सुनील तत्कारे वर महेंद्र दालवी: रायगड जिल्ह्यातील रोहा येथील एका कार्यक्रमात आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तटकरेंच्या संपूर्ण राजकीय कुरघोड्या काढत त्यांनी टीका केली. तटकरे हे रायगड व महाराष्ट्राला फसवणारे नेते असून, त्यांचं कामच फसवणूक करणं आहे असा घणाघाती आरोप दळवींनी तटकरेंवर केला.

सुनील तटकरे सारख्या नालायकांबरोबर असा उल्लेख करत त्यांनी महायुतीमध्ये राष्ट्रवादी बरोबर आम्ही कधीही युती करणार नाही. आम्ही ‘एकला चलो’ या भूमिकेत आहोत, असं त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं. तसेच मंत्री भरत गोगावले यांच्या आईच्या नावावर राजकारण करून अवमान करणं हे तटकरेंना शोभत नाही. रायगडकर हे कधीही सहन करणार नाहीत, असा इशाराही महेंद्र दळवींनी खासदार सुनील तटकरे यांना दिला. संपूर्ण भाषणातून दळवींनी तटकरेंवर आगपाखड केली आहे.

गेल्या काही दिवसापूर्वीच महेंद्र दळवी यांनी सुनिल तटकरे यांच्यावर टीका केली होती. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणून वरिष्ठांचा जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य असेल. मात्र महायुतीतच राहुन कोणी  वेगवेगळे प्रयोग केले तर त्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी करु असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यासह भाजपला नाव न घेता दिला होता. त्यामुळं रायगड जिल्ह्यात महायुतीतील संघर्ष अजूनही  कायमच आहे. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतच रस्सीखेच आणि चढाओढ सुरू झाल्याचे पाहायला मिळते. शिंदे शिवसेनेच्या अलिबाग मुरुड मतदार संघाच्या  कार्यकारिणी सदस्यांची  बैठकीच  आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये सर्व काही ठिक नसल्याचे चित्र दिसत आहे. राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार हे सातत्याने ऐकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. गेल्या अनेक दिवसापासून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा चर्चेत आला आहे. आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात कोण पालकमंत्री होणार याची चर्चा सुरु आहे. सुरुवातील आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद दिले होते. मात्र, शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी विरोध केल्यामुळं पुन्हा रायगडचे पालकमंत्रीपद रिक्त ठेवण्यात आले आहे. या मुद्यावरुन देखील शिवसेना शिंदे गटाचे आमदार तटकरेंवर टीका करताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

महायुतीत वेगवेगळे प्रयोग केले तर ना घर का ना घाट का अशी अवस्था करु, शिवसेना आमदाराचा तटकरेंसह भाजपला इशारा

आणखी वाचा

Comments are closed.