…..अन् नाना पटोले अधिकाऱ्यांवर भडकले; लाखांदुरच्या आमसभेत अधिकाऱ्याला सुनावले खडेबोल


भंडारा बातम्या: मागील वर्षी झालेल्या आमसभेचा इतिवृत्त अहवाल लाखांदूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतला दिल्याची खोटी माहिती आमसभेत उपस्थित अधिकाऱ्यानं आमदार नाना पटोले यांना दिली. मात्र, अधिकारी नाना पटोलेंची दिशाभूल करीत असल्याचं सांगत आमसभेत उपस्थित सरपंचांनी अधिकाऱ्याचा खोटारडेपणा उघडकीस आणला. यावरून कधी नं भडकणारे नाना पटोले (Nana Patole) हे अधिकाऱ्यावर चांगलेचं भडकल्याचं बघायला मिळाले. साकोली विधानसभेच्या लाखांदूर पंचायत समितीच्या आमसभेत हे चित्र बघायला मिळालं. जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना आमसभेत उपस्थित राहण्यासाठी पत्र दिल्यानंतरही ते उपस्थित नं राहिल्यानं अधिकाऱ्यांचं लोकांच्या प्रश्नावर लक्ष नाही. टाईमपास चाललेला आहे. वर्षभर तुमचा पगार दिला नाही तर, तुम्ही काय करणार? आपण जनतेच्या कामाचा पगार घेतोय, त्यांचे नौकर आहोत. जनतेचा अपमान करताय. आमसभा चिवडा खायची नसते. अशा कडक शब्दात नाना पटोलेंनी उपस्थित अधिकाऱ्यांना खडे गीत सुनावलेवाय?

…..अन् पंचायत समिती प्रशासनात चांगलीच तारांबळ (Nana Patole in Lakhandur General Meeting)

दरम्याननाना पटोले एवढ्यावरच नं थांबता त्यांनी लाखांदूर पंचायत समितीचे खंड विकास अधिकाऱ्यांनाएकल धारेवर धरत मागील आमसभेचा अहवाल नामंजूर करण्यात येत असल्याची घोषणा केल्यानं पंचायत समिती प्रशासनात चांगलीच तारांबळ उडाली. या आमसभेला भंडारा अदृषूक गोंदियाचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, लाखांदूर नगराध्यक्ष यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

ठाकरेंच्या शिवसेनेचे गोंदिया जिल्हाप्रमुख आणि राष्ट्रवादीचे गोंदिया शहराध्यक्ष यांच्यात तुफान राडा (Shivsena UBT vs Ajit Pawar NCP)

राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना धार्मिक आणि सामाजिक ठिकाणचे देखील गांभीर्य राहिले नसल्याची घटना गोंदिया शहरात उघडकीस आली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पंकज यादव आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे गोंदिया शहर अध्यक्ष नानू मुदलीयार या दोघांमध्ये मामा चौक परिसरातील मा दुर्गाच्या पेंडोलमध्ये तुफान हाणामारी झाल्याचे समोर आले आहे.

सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पंकज यादव हे दुर्गा देवीच्या दर्शनासाठी जात असताना एका तरुणांने त्यांना थांबविले. दरम्यान जिल्हाप्रमुखाने त्या तरुणाला मारहाण केली. त्यानंतर मध्यस्थी करायला आलेल्या अजित पवार गटाच्या शहर अध्यक्षांना देखील मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असुन या प्रकरणात गोंदिया शहर पोलिसांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पंकज यादव यांच्यासह अन्य पाच जणांवर मारहाणीचा गुन्हे दाखल केला आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पंकज यादव यांनी देखील पोलिसात तक्रार दिली. अद्यापपर्यंत त्यांच्या तक्रारीच्या संदर्भात कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. घटनेचा पुढील तपास गोंदिया शहर पोलीस करत आहेत.

संबंधित बातमी:

आणखी वाचा

Comments are closed.