नवऱ्याच्या उपचारादरम्यान ओळख; पतीच्या मृत्यूनंतर जवळीक अन् माझं तुझ्यावर प्रेम, लग्न करायचं आमि


ठाणे : अंबरनाथमधील प्रसिद्ध ऑर्थोपेडिक डॉक्टरच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा (Thane Crime News) दाखल करण्यात आला आहे. डोंबिवलीतील मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये एका महिलेने हा गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला डोंबिवली मानपाडा पोलिस ठाण्याच्या (Thane Crime News) हद्दीत राहते. तिच्या पतीच्या उपचारादरम्यान तिची आणि या डॉक्टरची ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत डॉक्टरने तिला लग्नाचे आमिष दाखवत सातत्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा महिलेचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. वैद्यकीय क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या डॉक्टरवर गंभीर आरोप झाल्याने अंबरनाथ परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.(Thane Crime News)

Thane Crime News: शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला

मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथमधील प्रसिद्ध ऑर्थोपेडिक डॉक्टरने लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेचा आरोप आहे की, डॉक्टरने महिलेवर अनेकदा शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. मात्र या प्रकरणाची माहिती डॉक्टरच्या पत्नीला मिळताच त्याने पीडितेला फोन करून “माझी चूक झाली, मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही” असे सांगितले. त्यानंतर पीडित महिलेनं मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकारामुळे ठाणे आणि मुंबई परिसरात खळबळ उडाली आहे.

Thane Crime News: पत्नीला घटस्फोट देणार आहे, त्यानंतर आपण लग्न करू

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टरचे वय ५२ असून तो मुंबईतील रुग्णालयासोबत ठाण्यातील एका रुग्णालयात मानद सेवा देखील देतो. पीडित महिला ही देखभाल व दुरुस्तीचे काम करणारी असून तिच्या तक्रारीनुसार २०२३ ते २०२४ दरम्यान डॉक्टरने “पत्नीला घटस्फोट देणार आहे, त्यानंतर आपण लग्न करू” असे आश्वासन देऊन वारंवार लैंगिक शोषण केले. महिलेच्या पतीला गंभीर आजार असल्याने त्यांनी उपचारासाठी ठाण्यातील रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी आरोपी डॉक्टरची ओळख झाली. २०२१ मध्ये पतीचे निधन झाल्यानंतर डॉक्टर नियमित विचारपूस आणि मुलाला मार्गदर्शनासाठी तिच्या घरी येऊ लागले. या भेटींचा गैरफायदा घेत डॉक्टरने “माझे आणि पत्नीचे पटत नाही, मला तुझ्यासोबत राहायचे आहे” असे सांगत तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि तिच्यावर अत्याचार केले, असे फिर्यादीत नमूद आहे.

Thane Crime News: महिलेच्या डोंबिवलीतील घरी येऊन पतीला तपासून निघून जात

पीडित महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा पती हृदयरोगाने ग्रस्त होता. तसेच त्यांच्या पायाला गँगरीन झालं होतं. यामुळे त्यांनी ठाण्यातील प्रसिद्ध रुग्णालयात आपल्या पतीला उपचारासाठी दाखल केलं होतं. यावेळी तेथील डॉक्टरने पतीचे पाय गुडघ्यापासून खाली कापावे लागतील, असं सांगितलं. यासंदर्भातची यशस्वी शस्त्रक्रिया अस्थिरोग तज्ज्ञ असलेल्या आरोपी डॉक्टरने केली. त्यानंतर या डॉक्टरशी महिलेचा पतीच्या रुग्ण सेवेच्या माध्यमातून संबंध आला. पतीचे औषधोपचार, काही मार्गदर्शनासाठी पीडित महिलेने संपर्क केला की संबंधित डॉक्टर पीडित महिलेच्या डोंबिवलीतील घरी येऊन पतीला तपासून निघून जात होते. पतीची तब्येत खालावल्याने २०२१ मध्ये त्यांचे निधन झाले.

त्यानंतर संबंधित डॉक्टर आपल्या तब्येतेची नियमित विचारपूस करायचे. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मुलाला घरी येऊन दोन ते तीन तास मार्गदर्शन करायचे. त्या निमित्ताने घरी चहा, जेवण सोबत व्हायचे. आपला मुलगा बाहेरगावी शिक्षण घेत आहे याची माहिती डॉक्टरांना होती. एक दिवस मी घरी एकटी असताना डॉक्टरांनी काही बोलायचे आहे असे बोलून ‘माझ तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्यासोबत राहायचे आहे. माझे आणि पत्नीचे पटत नाही. मी लवकरच तिला घटस्फोट देणार आहे’ असे सांगितले. त्यानंतर त्यांनी आपल्याशी आपल्या मनाविरूध्द जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

आणखी वाचा

Comments are closed.