काका-पुतण्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण; अजित पवारांनी सांगितलं नेमकं कारण, म्हणाले ‘मी…..’


मुंबई : राज्यात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची चर्चा रंगत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गटप्रमुख एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे जाऊन पक्षप्रमुख शरद पवार यांची भेट (Sharad pawar ajit pawar meeting) घेतली. माळेगाव साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेची तारीख व वेळ ठरवण्यासाठी ही भेट झाल्याची प्राथमिक माहिती असली तरी, दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह राजकीय घडामोडींवरही संवाद झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या भेटीबाबत अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.(Sharad pawar ajit pawar meeting)

Ajit Pawar: भेटीवर काय म्हणाले अजित पवार?

अजित पवारांनी या भेटीबाबत बोलताना म्हटलं की, शरद पवारांसोबतची भेट साखर कारखान्यात होती. माझ्या मतदार संघामध्ये वेगवेगळे साखर कारखाने आहेत. त्यांना मदत देणं हे प्राधान्य आहे. माळेगाव साखर कारखान्याचा मी व्हॉइस चेअरमन आहे. शिक्षण संस्था चालू असताना होणारी अडचण या संदर्भात बैठक घेतली होती, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

Sharad Pawar:  दोन दिवसांपासून सर्व भेटी रद्द

काल (बुधवारी, ता1) संध्याकाळी ५ वाजता झालेली ही भेट विशेष ठरली आहे. कारण, फुटीनंतर प्रथमच शरद पवार आणि अजित पवार ठरवून प्रत्यक्ष भेटले आहेत. यापूर्वी ते काही वेळा कार्यक्रमांच्या निमित्ताने किंवा संस्थात्मक बैठकीत एकत्र आले होते, मात्र या वेळी ठरवून झालेली भेट असल्याने राजकीय चर्चेला अधिक उधाण आलं आहे. या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार यांनी प्रकृतीच्या कारणाने दोन दिवसांपासून सर्व भेटी रद्द केल्या. बुधवारी संध्याकाळी ५ वाजता ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दाखल झाले. पाठोपाठ अजित पवार पोहोचले. काका-पुतण्यात तब्बल एक तास चर्चा झाली.

Anand Paranjpe: दोन वरिष्ठ नेते भेटले तर त्यात गैर नाही

संध्याकाळी 5 वाजता ते वाय.बी. चव्हाण सेंटर येथे आले आणि त्यानंतर अजित पवार त्याठिकाणी आले. या दोन्ही नेत्यांमध्ये येथे तब्बल 1 तास चर्चा झाली आहे. त्यामुळे, आगामी राजकीय बदलाचे वारे वाहत आहेत का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या भेटीचं स्वागत केलं आहे. दोन वरिष्ठ नेते भेटले तर त्यात गैर नाही, शरद पवार हे देशाचे नेते आहेत. महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसदर्भाने, सामाजिक विषयाच्या अनुषंगाने ही भेट झाली असावी. महाराष्ट्राच्या विकासासाठीच ही भेट झाली असावी, अशी प्रतिक्रिया अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे यांनी दिली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.