ठाकरेंच्या मेळाव्यासाठी शिवसैनिक झटले, शिवाजी पार्कात चिखलावर फळ्या टाकल्या, दसरा मेळाव्याची जय


Dasara Melava Shivsena UBT Uddhav Thackeray मुंबई: शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (मराठी) दोन्ही गट दसरा मेळावे (Dasara Melava) आयोजित करतात. त्याप्रमाणे आज ठाकरेंच्या सेनेचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क येथे होणार आहे. मोठा मंच या मेळाव्यासाठी उभारण्यात आला आहे. तर संपूर्ण मैदानात खुर्च्या आणि आसनव्यवस्था उभारण्यात आली आहे. मंचावर असलेल्या बॅनरवर “विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा” असा आशय असलेल बैकड्रॉप उभारण्यात आला आहे. यावर बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा ही फोटो पाहयाला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण मैदानात चिखल साचला असला, तरीही मोठ्या प्रमाणावर व्यवस्थेची तयारी करण्यात आली आहे.

मैदानात ज्या ठिकाणी चिखल तिथे लाकडी फळ्या टाकण्यात येणार आहे. जिथे पाणी साचलं तिथे पाण्याचा निचरा करण्यासाठी शिवसैनिकांचा प्रयत्न सुरु आहे. दसरा मेळावा सुरळीत पार पडावा यासाठी जबाबदारी स्थानिक आमदार-खासदार आणि मुंबईतील विभाग प्रमुखांना देण्यात आली आहे. यावेळी त्यांचा (शिंदे गटाचा) मेळावा पिंजऱ्यात आमचा मेळावा मैदानात, असं ठाकरे गटाचे स्थानिक आमदार महेश सावंत (Mahesh Sawant) म्हणाले. दरम्यान, आजच्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलतात आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणती घोषणा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन्ही ठाकरे बंधूंची जवळीक वाढल्यानंतर होणारा हा पारंपरिक दसरा मेळावा आहे. दोन्ही भावांची जवळीक वाढली मात्र राजकीय युतीही होणार का ? यासंदर्भात उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागलंय.

शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा- (मराठी Dasara Melava)

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील नेस्को एग्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे होणार आहे. या मेळाव्याची वेळ सायंकाळी ६ वाजता असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदाचा दसरा शेतकऱ्यांच्या बांधावर, स्थळ बदललंय परंपरा नाही… अशी पोस्ट एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या ठिकाणाबद्दल माहिती देताना केली आहे. या मेळाव्यातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर नेते काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याआधी मेळाव्याचं ठिकाणी आझाद मैदान ठरलेलं मात्र पावसामुळे मैदानात चिखल झाल्याने ठिकाण बदलण्यात आलं.

https://www.youtube.com/watch?v=bju5xgjgw78

संबंधित बातमी:

Dasara Melava: राज्यात यंदा पाच दसरा मेळावे; उद्धव ठाकरे मोठी घोषणा करणार? एकनाथ शिंदेंच्या भाषणाकडेही लक्ष

आणखी वाचा

Comments are closed.