बाळासाहेबांच्या हातांचे ठसे घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दोन दिवस मृतदेह तसाच ठेवला, रामदास कदमांच


रामदास कदाम यांनी उधव ठाकरे स्लॅम केले: उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा हक्क नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतरही दोन दिवस उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांचा मृतदेह तसाच ठेवून दिला होता, असा खळबळजनक आरोप शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला. शिवसेनाप्रमुखांचं निधन कधी झालं, त्यांचा मृतदेह किती दिवस मातोश्रीमध्ये ठेवला होता, काढा माहिती. हे मी जबाबदारीने बोलत आहे. मी खूप मोठं विधान करतोय याची जाणीव मला आहे. पण त्यावेळी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Death) यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना विचारा, असे रामदास कदम यांनी म्हटले. ते गुरुवारी मुंबईतील नेस्को सेंटर येथे आयोजित केलेल्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात बोलत होते. यावेळी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत स्फोटक आरोप केले.

उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर का ठेवला होता? आतमध्ये तुमचं काय चाललं होतं? आम्ही मातोश्रीच्या खाली बसलो होतो. मी आठ दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपत होतो. सगळं कळत होतं, पण हे सगळं कशासाठी होतं? कोणीतरी सांगितलं बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले. हे हाताचे ठसे कशासाठी घेतले होते? त्यावेळी मातोश्रीवर या सगळ्याची चर्चा सुरु होती. बाळासाहेब ठाकरे यांचे मृत्यूपत्र कधी करण्यात आले, त्यावर कोणाची सही होती, काढा सगळी माहिती, असे रामदास कदम यांनी केले.

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रि‍पदाचा हव्यास होता. त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना तिलांजली दिली. त्यांनी काँग्रेससोबत जाऊन शिवसेना सोनिया गांधी यांच्या पायाखाली बांधली. पण सर्व शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे आहेत. ‘मुंबई तुमची, भांडी घासा आमची’, अशी घोषणा व्हायची. आज हे राज ठाकरे यांच्याकडे भीकेचा लोटा घेऊन जात आहेत. आता एक काय १० भाऊ आले तरी काय. आज मराठी माणूस मुंबईबाहेर केला, हे पाप उद्धव ठाकरे यांचे आहे. उद्धव ठाकरे यांनी ३० वर्षे फक्त टक्क्यांचं राजकारणं केले. मुंबईचा महापौर आपला असला तरी तिथे जायचा अधिकार आम्हाला नव्हता, असे रामदास कदम यांनी म्हटले.

https://www.youtube.com/watch?v=AT3EX1EZ0PC

आणखी वाचा

सॅनिटरी पॅडवर आदित्य ठाकरेंचे फोटो लावले होते, रश्मी वहिनी मुलाला हेच संस्कार दिलेत का? शिंदे गटाच्या ज्योती वाघमारेंची बोचरी टीका

आणखी वाचा

Comments are closed.