बायकोकडे वाईट नजरेने पाहिल्याचा राग, बाईकवर बसवलं, बियर पाजली आणि गेम केला, मराठवाड्यातील थरकाप


नंडेड नायगॉन गुन्हेगारी बातम्या: पत्नीकडे लाईट नजरेने बघत असल्याच्या संशयावरुन 17 वर्षीय तरुणाला मोटारसायकलवर नेले बियर पाजली आणि रात्री खून करुन प्रेत गडगा कौठा रोडवर टाकल्याची घटना दि. 2 आक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. सदर प्रकरणी आरोपीस अटक (Nanded) करण्यात आली आहे.

मुखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील जिशान लतिफ सय्यद (17) आणि गावातीलच अब्बास शेख यांच्यात मोहर्रमच्या वेळी भांडणे झाली. त्यावेळी दोघांच्या नातेवाईकांनी भांडणाची सोडवा-सोडव केली होतो. त्यावेळी आब्बास याने जिशान हा त्याचे पत्नीकडे वाईट नजरेने पाहत असल्याचे सांगून भांडण करत होता. त्यावेळी जिशान याला विचारले असता त्याने मी वाईट नजरेने पाहिले नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे दोघातील वाद मिटला होता आणि दोघे मित्र झाले होते. मात्र पुढे पुन्हा नको नको ते घडलं.

नेमकं काय घडलं? (What exactly happened?)

काल दि. 1 आक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता जिशान हा घरा जवळील मस्जीदमध्ये नमाज पडण्यासाठी गेला. नमाज झाल्यानंतर जिशान हा गावातील त्याचा मित्र आब्बास रमजानसाब शेख याचे मोटार सायकलवर बसून गेला होता. जिशान हा आब्बास सोबत जात असताना गावातील यादुला सलीम सय्यद, करीम चांद सय्यद, मोहम्मद वजीर सय्यद यांनी पाहिले होते. त्यानंतर रात्री साडेसात वाजता जावई रहिम महेबुब नांदेडे यांनी जिशान यास घरी बोलण्यासाठी फोन केला असता जिशानने मी पेट्रोल आणण्यासाठी बाहेर आलो असून घरी गेल्यानंतर फोन करुन देतो, असे म्हणून फोन ठेऊन दिला.

डोक्यात दगडाने व छातीत चाकूने मारले- (Hit in the head with a stone)

जिशान रात्री उशिरापर्यंत घरी आला नसल्याने घरातील सदस्यांना चिंता लागली होती. वडिलांनी शेख अब्बास यास फोन लावला असता  मला काही माहित नसल्याचे सांगितले. अब्बास याने उडवाउडवीची उत्तर दिल्यानंतर दि. 2 आक्टोबर रोजी सकाळी मुखेड पोलीस ठाणे गाठले व सदरचा प्रकार सांगितला असता मुखेड पोलिसांनी नायगाव तालुक्यातील गडग्याजवळ एक प्रेत सापडल्याचे सांगितले व फोटो दाखवले. फोटोमधील प्रेत हे जिशान सारखेच दिसत असल्याने  रहिम महेबुब नांदेडे, सलीम शेख व अजीज शेख असे गडगा येथे जाऊन पाहिले व जिशान् असल्याची खात्री झाली. जिशानच्या डोक्यात दगडाने व छातीत चाकूने मारल्याचे दिसून आले. तसेच जिशानच्या अंगावरील कपडे व पोटावरील भाग अर्धवट जळाला असल्याचे दिसले. मयत जिशानच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरुन नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून आरोपी आब्बास रमजानसाब शेख यास अटक करण्यात आली.

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

संबंधित बातमी:

Mumbai Crime News: ‘500 रुपयांत शरीरसंबंध’, तरुणीसोबत केला सौदा अन् फसला, मुंबईत तरूणासोबत ‘त्या’ रूममध्ये झालं भयानक कांड

आणखी वाचा

Comments are closed.