वैभव खेडेकरांचा भाजप पक्षप्रवेश अजूनही अनिश्चित; स्टेटस ठेवत म्हणाले, माझ्याच वाट्याला…
Vaibhav Khedekar: मनसेतून बडतर्फ करण्यात आलेले वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांना भाजपकडून (BJP) पुन्हा वेटिंगवर ठेवण्यात आलं आहे, कोकणातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांना काही दिवसांपूर्वी पक्षातून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर वैभव खेडेकरांचा भाजपमधील पक्षप्रवेश निश्चित करण्यात आला होता. यासाठी वैभव खेडेकर शेकडो गाड्या घेऊन मुंबईत देखील दाखल झाले होते. मात्र पक्षप्रवेश न करता वैभव खेडेकरांना माघारी परतावे लागले. त्यानंतर 8 ते 10 दिवस उलटूनही वैभव खेडेकरांचा भाजप पक्षप्रवेश अजूनही अनिश्चित असल्याचं बोललं जात आहे.
भाजप पक्षप्रवेशाच्या प्रश्नावर वैभव खेडेकरांचे मौन कायम आहे. तसेच माध्यमांसोबत बोलण्यास वैभव खेडेकरांचा स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून वैभव खेडेकर यांचे संभ्रमात टाकणारे व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत आहे. जेवणात आणि जीवनात ठेचा खाल्ल्याशिवाय मजा नाही, असं वैभव खेडेकरांनी म्हटलं आहे.
गौरवशाली खेडेकरानी स्थितींपैकी, नेमकान काया मस्तलाया? (वैभव खेडेकर स्थिती)
सर्वांशी चांगलं वागूनही देव माझ्याच वाट्याला अडचणी का टाकतो? यामागे देखील एक कारण आहे. देव त्याच्याच वाटेला अडचणी टाकतो, ज्याच्यामध्ये अडचणी पेलण्याची ताकद आहे आणि जो अडचणींवर मात करून पुढे जातो त्याला देव नक्की मोठा करतो. वैभव खेडेकरांच्या व्हाट्सअप स्टेटसचा रोख नेमका कोणावर?, याबाबत जोरदार चर्चा आहे.
उदय समंत काय मुनाले यांच्या उरलेल्या भाजपा बाकी वैभव खेडेकरच्य भाजपा बाकी? (वायभव खेडेकरवरील उदय समंत)
वैभव खेडेकर माझे जवळचे मित्र आहेत. मात्र त्यांचा पक्षप्रवेश का रद्द झाला माहिती नाही. पक्षप्रवेश तीन वेळा रद्द होणं हे खच्चीकरण आहे. ते भाजपात चालले ना, ते शिवसेनेत येतात का बघा…तीनवेळा त्यांचा पक्षप्रवेश आमच्याकडे रद्द होणार नाही, याची खात्री देतो, असं उदय सामंत म्हणाले.
वैभव खेडेकर कोन? (कोण वैभव खेडेकर आहे)
वैभव खेडेकर हे राज ठाकरे यांचे कोकणातील महत्त्वाचे आणि गेल्या 20 वर्षांपासूनचे शिलेदार मानले जात होते. त्यांनी 2014 मध्ये वैभव खेडेकर यांनी दापोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. राज ठाकरेंनी मनसे स्थापन केल्यापासून ते त्यांच्याबरोबर होते. इतकंच नाही तर खेड नगरपरिषद निवडून आणण्यात वैभव खेडेकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. ते यापूर्वी खेडचे नगराध्यक्ष होते. यापूर्वी त्यांचा थेट सामना शिवसेना नेते रामदास कदम यांच्यासोबत राहिला होता, पण अलिकडे हा संघर्ष कमी झाला. युवा वर्गामध्येही वैभव खेडेकर यांची क्रेझ आहे. वैभव खेडेकर यांच्यावर आता सद्यस्थितीत मनसेच्या राज्य सरचिटणीस, कोकण संघटकपदाची मोठी जबाबदारी होती.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.