मी जे सांगितलं, तेच झालं, उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले: देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: मी मुख्यमंत्री असताना कोविड काळात केलेल्या कामामुळे देशात एक नंबरचा मुख्यमंत्री ठरलो होतो. पण आता मुख्यमंत्र्यांच्या कामाची यादी जाहीर झाली आहे. त्यामध्ये योगी आदित्यनाथ हे पहिल्या क्रमांकावर आहेत. तर आपले मुख्यमंत्री दहाव्या क्रमांकावर आहेत, असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला. काल शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा मुंबईतील शिवतीर्थ मैदानावर झाला. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
राज्यातील शेतकरी हताश झालाय, तो लढतोय. पण देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) अजून अभ्यास सुरू आहे. तिकडे पंतप्रधान काहीही मदत करत नाहीत. बिहारमध्ये निवडणुका आल्यानंतर पंतप्रधानांनी तिथल्या महिलांच्या खात्यावर 10-10 हजार रुपये टाकले. पण महाराष्ट्रातल्या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला काहीही मदत केली नाही. यांच्याकडे पैसे आहेत, पण महाराष्ट्राबद्दल असलेल्या द्वेषामुळे ते मदत करत नाहीत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरेंच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरेंनी माझे एक हजार रुपये वाचवले- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Uddhav Thackeray)
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी उद्धव ठाकरेंचे आभार मानेल. उद्धव ठाकरेंनी माझे एक हजार रुपये वाचवले. मी आवाहन केलं होतं, की उद्धव ठाकरेंच्या भाषणात एकतरी विकासाचा (Uddhav Thackeray Dasara Melava) मुद्दा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा. मी काही त्यांचं भाषण ऐकलं नाही. परंतु मी पत्रकारांकडून माहिती घेतली. उद्धव ठाकरेंनी विकासाच्या मुद्द्यावर भाष्य केलं नाही. त्यामुळे माझे एक हजार रुपये वाचले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. एखादा व्यक्ती निराश झाला तर तो अदवातदवा बोलत असतो. त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नसते, असा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी लगावला.
भाजपने झेंड्यातील हिरवा रंग आधी काढावा- उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray On BJP)
एका बाजूला हे मुस्लिमांना शिव्या देणार, त्यांना देशद्रोही म्हणणार, आणि त्याचवेळी आरएसएसचे मोहन भागवत हे दिल्लीमध्ये मुस्लिम मौलवींची भेट घेणार ही अशी यांची नीती आहे.हिंदुत्वावरून आमच्या अंगावर येऊ नका, नाहीतर तुमच्या सगळ्या टोप्या घातलेले फोटो आम्ही समोर आणू. भाजपने त्यांच्या झेंड्यातील हिरवा रंग आधी काढावा आणि मग आम्हाला हिंदुत्व शिकवावे.
https://www.youtube.com/watch?v=ASIB7C6CDT4
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.