मनोज जरांगे बावळट अन् मूर्ख, कुठून शोधलं दिवटं? जरांगेंनी पाचवीला ॲडमिशन घ्यावं लक्ष्मण हाकेंचा


बीड: राज्यात सध्या मराठा आरक्षणासह (maratha reservation) ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) विषयावरून वातावरण तापल्याचं चित्र आहे. पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्यामध्ये पुन्हा एकदा एकमेकांवर हल्लाबोल केल्याचं दिसून आलं आहे. मनोज जरांगे यांनी लक्ष्मण हाके यांच्याबाबतच्या प्रश्नावर अश्लील हातवारे केल्याचं दिसून आलं, याबाबत बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, त्यातून त्यांची संस्कृती दिसून आली आहे. जरांगे यांना पाचवीत नेऊन टाका म्हणजे त्यांना नागरिकशास्त्र कळेल आणि बाकी सगळं त्यांना लगेच लक्षात येईल. ही सार्वजनिक ठिकाणी बोलण्याची भाषा आहे का? विचाराचं उत्तर कधीतरी उत्तराने द्यावं असंही हाकेंनी म्हटलं आहे.(Laxman Hake on Manoj Jarange)

Laxman Hake on Manoj Jarange : जरांगे सारख्या नेता मिळाला हे मराठ्यांचे दुर्दैव

एक दिवस मनोज जरांगेंसमोर बूम नसला तर त्याच्या जिवाचा तिळपापड होतो.ते माझ्याबाबत बोलताना टीका करताना म्हणातात, कधी मी येवल्याचा माणूस आहे. कधी फडणवीस यांचा माणूस आहे, असं जरांगे म्हणतात, यांच्या डोक्याची मंडई झाली आहे, मनोज जरांगे हरामखोर माणूस आहे. महाराष्ट्रातलं वातावरण जरांगे यांनी बिघडवले. मराठ्यांना मनोज जरांगे सारख्या नेता मिळाला हे मराठ्यांचे दुर्दैव आहे. मनोज जरांगेंची भाषा लोकशाहीची नाही. कधीतरी त्यांनी विचाराचं उत्तर विचारांनी द्यावं. मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही. हे फक्त आम्ही म्हणत नाही तर हे आयोग म्हणत आहे, सुप्रिम कोर्ट म्हणत आहे, अनेक आयोग म्हणत आहेत, याचं उत्तर जरांगेंकडे नाही, असंही पुढे लक्ष्मण हाकेंनी म्हटलं आहे.

Laxman Hake on Manoj Jarange : जरांगे नेमकं कोणत्या नावाला चॅलेंज करणार

जरांगे यांनी केलेल्या सगळ्या समाज बांधवांनी ज्यांचे समान अडनाव आहे, त्यांनी नोंदी शोधण्यासाठी अर्ज करा. ज्या 58 लाख नोंदी राहिले आहेत त्याची यादी लवकर लावा, या मागणीवर बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, आता मोरे हे आडनाव मराठा आहे, ओबीसी आहे, एससी आहे, मग जरांगे नेमकं कोणत्या नावाला चॅलेंज करणार आहेत. राज्यातल्या या माणसांची लाज वाटते ज्यांना जरांगे सारखा माणूस निवडावा लागला. न्यायमूर्ती पी व्ही सावंत कुठे, बीजी कोळसे पाटील कुठे, एनडी पाटील कुठे, आणि जरांगे कुठे हा काय दिवटा आहे. कुठून शोधला आहे याला, याच्या डोक्यावर पहिल्यांदा इलाज करा, पहिल्यांदाचा यांना चांगल्या मानसोपचारतज्ज्ञाकडे दाखवा, हा माणूस महाराष्ट्राची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. जरांगे दहा टक्क्यांच्या मतावर उड्या मारत आहेत, बाकीच्या 90 टक्क्यांनी एकत्र आल्यावर त्यांना दहा टक्के एकत्र आणता येत असतील तर आम्ही 90% एकत्र आणल्या तर त्यांचं काय होईल, त्यामुळे जरांगे हे बावळट माणूस आहेत, मूर्ख माणूस आहेत महाराष्ट्राने यांच्या नादाला लागू नये, ही माझी महाराष्ट्रातील बांधवांना हात जोडून विनंती आहे, असेही पुढे लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे

मनोज जारानरेंज वर लक्ष्मण हाक: जारांज्नी पाचिला डेमिशन ग्यवान

जरांगेंनी पाचवीला ॲडमिशन घ्यावं. शाळेत जावं. शाळा शिकल्यावर नागरिकशास्त्र इतिहास समाजशास्त्र त्यांना कळेल. दहावी बारावी झाल्यानंतर वेगळ्या कोर्सला लावू. महाराष्ट्र म्हणजे काय? शिवाजी महाराज कोण होते? हे सगळं सांगू…महाराष्ट्रात ओबीसी आणि एससी एसटीचे हक्क काय? हे सगळं सांगू, असा हल्लाबोल हाकेंनी जरांगेंवर केला आहे.

https://www.youtube.com/watch?v=tpph082cuok

आणखी वाचा

Comments are closed.