सांगलीत शरद पवारांना हादरा बसणार? बडा नेता भाजपच्या गळाला, लवकरच होणार पक्षप्रवेश
सांगली न्यूज: सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धक्का बसणाऱ्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण अण्णा लाड यांचे सुपुत्र शरद लाड हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. सध्या त्यांच्या भाजप मधील प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे. शरद लाड यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर, तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी शरद लाड हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती भाजपमधील काही नेत्यांनी दिली आहे. मुंबईत पक्ष प्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती मिळत आहे. हा पक्ष प्रवेश झाला तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी आणि जयंत पाटील यांना मोठा धक्का बसणार आहे. सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शऱद पवार गटाची ताकद कमी होणार आहे.
अरुण लाड यांच्या विजयात शरद लाड यांची महत्वाची भूमिका
पुणे पदवीधर निवडणुकीमध्ये अरुण लाड यांच्या प्रचाराची व्यूहरचना आखण्यापासून ते मनुष्यबळाचे योग्य नियोजन करण्यापर्यंतचे सर्व नियोजन शरद लाड यांनी केले होते. ते कुठेही प्रसिध्दीमध्ये दिसत नसले, तरी तेच अरुण लाड यांच्या निवडणुकीत पडद्यामागचे खरे सूत्रधार होते. त्यांनी पाचही जिल्ह्यांतील राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि मित्र पक्षांच्या प्रमुखांची भेट घेऊन अरुणअण्णांची भूमिका त्यांना पटवून दिली होती. स्थानिक नेतेमंडळींच्या साहाय्याने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. यासाठी त्यांच्या मदतीला क्रांती उद्योग समूह, भारती विद्यापीठ, राजारामबापू उद्योग संकुल, प्रत्येक जिल्ह्यातील नेत्यांच्या संस्थांतील कार्यकर्ते होते.
आमदार अरुण लाड यांनी गेल्या वेळी विधानपरिषदेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर लढवली होती. काँग्रेसच्या मदतीने त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत त्यांना आमदार डॉ. विश्वजीत कदम यांची देखील साथ मिळाली होती. या निवडणुकीची सर्व धुरा अरुण लाड यांचे सुपुत्र शरद लाड यांनी सांभाघली होती. योग्य नियोजन केल्यामुळं अटीतटीच्या लढतीत अरुण लाड हे विजय झाली होते. या मतदारसंघावर भाजपने दावा केला होता. मात्र, अरुण लाड यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला होता.
महत्वाच्या बातम्या:
Chandrakant Patil: चंद्रकांत पाटलांनी केली पडळकरांची पाठराखण; म्हणाले जयंत पाटील भाजपात आले तर ज्युनियर, गोपीचंद सिनिअर, मागे बसून….
आणखी वाचा
Comments are closed.