एकनाथ शिंदेंचे ओएसडी मंगेश चिवटेंच्या भावावर करमाळ्यात प्राणघातक हल्ला, रश्मी बागलांनी सुपारी द


करमाळा: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे (मराठी) ओएसडी मंगेश चिवटेंच्या (OSD Mangesh Chivte) भावावर करमाळ्यात प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर आज सकाळी झाला प्राण घातक हल्ला झाला आहे. महेश चिवटे हे एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. हल्ला झाल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजीत माने हे घटनास्थळी दाखल झाले असून सदर घटनेचा तपास पोलीस करत आहेत. करमाळा तालुक्यातील हिवरवाडी येथे सकाळी शेतात गेल्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. (DCM मराठीs OSD Mangesh Chivtes brother Mahesh Chivte was attacked in Karmala)

महेश चिवटे हे करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती आहे. आपल्यावर झालेला हल्ला हा दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांची सुपारी घेऊन करण्यात आल्याचा आरोप महेश चिवटे यांनी केला आहे. दिग्विजय बागल हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवार होते. तर त्यांची बहिणी रश्मी बागल कोलते या भाजपच्या महिला आघाडीच्या प्रमुख आहेत. चिवटे यांच्या आरोपामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना आणि भाजपमधील वाद पुन्हा समोर आला आहे.

https://www.youtube.com/watch?v=daeah6gtim4

आणखी वाचा

Comments are closed.