मनोरमा खेडकर पुन्हा गायब; बंगल्यावर चिकटवलेली नोटीस देखील फाडली, पोलीसांकडून पुन्हा शोध सुरु
मनोरमा खेडकर: नवी मुंबईतून क्लीनरचे अपहरण केल्याबद्दल पूजा खेडकरचे आईवडील दिलिप खेडकर आणि मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) या़ंच्यावर नवी मुंबईच्या रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र ३० ऑगस्टला मनोरमा खेडकर यांना १३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला होता. मात्र हा जामीन देताना मनोरमा खेडकर यांनी पोलीसांना तपासात सहकार्य करण्याची अट घातली होती. मात्र मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) या त्यानंतर गायब झाल्या असून पोलीसांचा त्यांच्याशी संपर्क होत नाहीये. शिवाय त्यांच्या वकिलांना देखील मनोरमा यांच्याशी संपर्क होत नाहीये. त्यामुळे रबाळे पोलीसांनी खेडकर यांच्या पुण्यातील बंगल्यावर चौकशीला हजर राहण्याची नोटीस चिकटवली होती. मात्र काही वेळापुर्वी ही नोटीस देखील फाडण्यात आली आहे.(Manorama Khedkar)
Manorama Khedkar: १३ ऑक्टोबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर
मनोरमा खेडकर यांना अपहरण प्रकरणात पुढील सुनावणीपर्यंत (१३ ऑक्टोबर) अंतरिम जामीन मंजूर केला होता. मनोरमा खेडकर या अपहरण प्रकरणात नाव येताच फरार झाल्या होत्या. त्यांच्या वकिलांनी ३० सप्टेंबरला बेलापूर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात समोर येऊन प्रकरणात जामीन मागितला. न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला, मात्र मुख्य सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी होईल असे सांगितले.
Manorama Khedkar: नेमकं प्रकरण काय?
१३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे सव्वा सातच्या सुमारास मुलुंड ते ऐरोली मार्गावर सिमेंट मिक्सर ट्रक आणि MH 12 RP 5000 नंबरच्या कारमध्ये अपघात झाला. या ट्रकमध्ये चालक चंदकुमार चव्हाण आणि हेल्पर प्रल्हाद कुमार हे दोघे होते, तर कारमध्ये दोन अज्ञात व्यक्ती होते. अपघातानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला आणि त्याच वेळी, कारमधील दोघांनी हेल्पर प्रल्हाद कुमारला जबरदस्तीने त्यांच्या कारमध्ये बसवून घेतले. त्यांनी ट्रक आमच्या मागे आणा, असे चालकाला बजावले, मात्र काही अंतर गेल्यावर कार नजरेआड झाली. घाबरलेल्या ट्रक चालकाने घटनेची माहिती ट्रक मालक विलास ढेंगरे यांना दिली. ढेंगरेंनी तात्काळ नवी मुंबईच्या रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात MH 12 RP 5000 क्रमांकाची कार पुण्यातील पूजा खेडकर यांच्या घरात उभी असल्याचे निष्पन्न झाले. त्वरित कारवाई करत नवी मुंबई पोलिसांची टीम खेडकर कुटुंबाच्या पुण्यातील घरी पोहोचली. पोलिसांनी घरी पोहोचल्यावर खेडकर यांच्या आईने गेट उघडण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती करत छाननी सुरू ठेवली. काही वेळाने खेडकर यांच्या घरातून ट्रक हेल्पर प्रल्हाद कुमार याची सुटका करण्यात आली.
या प्रकरणात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अपहरण झालेला हेल्पर खेडकर कुटुंबाच्या घरात कसा पोहोचला? अपघातात वापरलेली कार त्यांच्या ताब्यात कशी आली? अपघातातील दोघे आरोपी कोण होते आणि त्यांचा खेडकर कुटुंबाशी नेमका काय संबंध आहे? या सर्व बाबींची चौकशी नवी मुंबई पोलीस करत आहे. दरम्यान मनोरमा खेडकर यांनी जामीन याचिकेत स्वतःला फसवले जात असल्याचा दावा केला आणि तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. न्यायालयाने त्यांची याचिका मान्य करत अटक पासून संरक्षण दिले.
https://www.youtube.com/watch?v=6ta_4vpq32a
आणखी वाचा
Comments are closed.