अपघातावेळी गौतमी पाटीलचा ड्रायव्हर नशेत होता? मेडिकल रिपोर्टमधून खळबळजन खुलासा; नेमकं काय घडलं?
पुणे: आपल्या नृत्यशैलीमुळे सर्वांना भुरळ घालणारी गौतमी पाटील (Gautami Patil) पुन्हा एकदा वादात सापडली आहे, मात्र यावेळी कारण ठरलंय तिच्या कारचा अपघात. पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ काही दिवसांपूर्वी तिच्या गाडीचा पहाटेच्या सुमारास अपघात झाला असून, चालकाने रिक्षाला जोराची धडक दिल्याने तिघेजण जखमी झाले आहेत. रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाला आहे. अपघातात सामील असलेली कार गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) नावावर असल्याने पोलिसांनी तिला चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. या अपघातानंतर अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते, त्यानंतर गौतमी पाटील वाहनाचा अपघात झाला त्यावेळी ड्रायव्हरने मद्यपान केलं होत का अशी चर्चा होती. पोलिसांना ड्रायव्हरचा मेडिकल रिपोर्ट मिळाला आहे.(Gautami Patils car drivers medical report)
गौतमी पाटील वाहन अपघात प्रकरणानंतर ड्राइव्हरच्या केलेल्या चाचण्यांचा पोलिसांना मेडिकल रिपोर्ट मिळाला आहे. संतोष दिनकर उभे असं ड्रायव्हरचं नाव असून, ससूनच्या प्राथमिक अहवालात ड्रायव्हरने मद्यसेवन केले नसल्याचा ससून रुग्णालयाचा रिपोर्ट पोलिसांना मिळाला आहे.
Gautami Patils car drivers medical report: ड्रायव्हरच्या रिपोर्टमध्ये काय आहे?
ड्रायव्हरच्या श्वासात मद्याचा वास येत नव्हता. ड्रायव्हरच्या डोळ्याच्या बाहुल्या नेहमी प्रमाणे होत्या. ड्रायव्हरचे बोलणे स्थिर होते
डॉक्टरच्या म्हणण्याप्रमाणे सदर व्यक्तीने मद्याचे सेवन केले नसल्याचा रिपोर्ट समोर आला आहे. विश्लेषणात्मक तपासणीसाठी ड्रायव्हरचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. मात्र या संपूर्ण प्रकरणात सध्या पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.
Gautami Patils car Accident: मंत्री चंद्रकांत पाटलांचा पोलीस उपायुक्तांना फोन
वडगाव बुद्रुक परिसरातील एका रिक्षाला कारने धडकेत रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याने त्यांनी थेट कोथरुडचे (Pune) आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली होती. विशेष म्हणजे ज्या कारने रिक्षाला धडक दिली ती कार नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या नावावर असल्याने पोलिसांनी गौतमी पाटीला या अपघातप्रकरणी नोटीस बजावली आहे. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी असून सामाजी विठ्ठल मरगळे असे त्याचे नाव आहे. तर दुसरीकडे याच मुद्द्यावर कोथरूडचे आमदार असलेल्या चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Call to DCP) यांनी थेट डीसीपी संभाजी कदम यांना फोन लावत दोषींवर कडक कारवाई करण्याची निर्देश दिले आहेत. आता, पोलीस उपायुक्त संभाजी कदम (Police) यांनी गौतमी पाटीलवर कुठलाही कारवाई करता येणार नसल्याचे म्हटले. त्यासाठी, त्यांनी कायदेशीर बाजूही सांगितली.
Gautami Patils car Accident: नेमकं अपघात प्रकरण काय?
पुण्यातील मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ 30 सप्टेंबर रोजी एका हॉटेलसमोर एक रिक्षा उभी होती. त्यात रिक्षाचालकासह दोन प्रवासी होते. मागून आलेल्या गौतमी पाटीलच्या भरधाव कारनं उभ्या असलेल्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की, यामध्ये रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या अपघातात रिक्षाचालकासोबतच रिक्षातील दोन प्रवासीही गंभीर जखमी झाले. पोलिसांना अपघाताबाबत माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अपघातानंतर कारचालक फरार झाला होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी 30 वर्षीय वाहन चालकाला अटक केली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.