मुख्यमंत्री एवढा लबाड कसा बोलतोय, शेतकरी तुम्हाला खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाहीत: बच्चू कडू
बॅचू कडू: एनडीआरएफच्या निकषाशिवाय राज्य सरकार शेतकऱ्यांना कुठलीही मदत देणार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना यांनी ओला दुष्काळ जाहीर करा असे पत्र पाठवले होते. आता तुम्ही म्हणतात ओला दुष्काळ कायद्याच्या शब्दात येत नाही. हा मुख्यमंत्री एवढा लबाड कसा बोलतोय हेच समजत नाही, असे म्हणत प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. सातबारा कोरा करतो म्हणणारा मुख्यमंत्री दुष्काळ पडल्यावर देऊ असं म्हणतो. कर्जमाफीसाठी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री दुष्काळाची वाट पाहतो हा किती करंटेपणा आहे. म्हणजे माणूस मेल्यावर तुमचं कर्ज माफ होईल हे प्रभू रामाचे भक्त आहेत मुह मे राम बगल मे सुरी.असे म्हणत कडू यांनी टीका केली. पैसे नाही असं म्हणतात मग शक्तीपीठ आलं कुठून असेही कडू म्हणाले.
मुख्यमंत्री बनवाबनवी करतायेत
शेतकऱ्यांसाठी आलो एवढा आधार शेतकऱ्याला आधार मिळेल माझ्या शेतकऱ्यांच्या दोन-तीन आत्महत्या थांबतील. सध्या मुख्यमंत्री बनवाबनवी करत आहे. काल पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री कशात हुशार आहे हे मला काल कळालं. पंजाबने शेतकऱ्यांना 50000 दिले तुमच्या सरकार किती देणार हा त्या पत्रकाराचा प्रश्न होता. मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आमच्या आठ कलेक्टरांचे मीटिंग झाली. एखाद्या चौथीतला मुलगा तरी उत्तर बरोबर देतो प्रश्न काय विचारता आणि तुम्ही सांगता काय. असे म्हणत बच्चू कडूंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. तुम्ही ही चतुराई शेतकऱ्यांसाठी वापरली तर शेतकरी तुम्हाला खड्ड्यात घेतल्याशिवाय राहणार नाही.
अजित दादा तुम्ही महाराष्ट्रात किती सोंगे केली
शेतकरी मरत आहे आणि अजित दादा म्हणतायेत पैशाचं सोंग करता येत नाही. अजित दादा तुम्ही महाराष्ट्रात किती सोंग केले. सोंग जमत नाही तर पदावर कशाला राहतात असे कडू म्हणाले. सातबारा कोरा करा म्हणणारा मुख्यमंत्री दुष्काळ पडल्यावर देऊ असं म्हणतो. पैसे नाही असं म्हणतात मग शक्तीपीठ आलं कुठून असा सवालहीत्यांनी केला. मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांना हरवायचं आहे म्हणून त्या ठिकाणी पैसे दिले. लग्न करायचं पण हुंड्यासाठी बबायको कामाची नाही अशी ही भाजपची अवलाद आहे.
कापूस आयात करतात आणि स्वदेशीचा नारा देतात, किती भुरळ पाडतात
मोदीजींनी आपला कापूस विदेशात पाठवला नाही मात्र इतर देशांचा कपूस आपल्या छाताडावर आणला. कापूस आयात करतात आणि स्वदेशीचा नारा देतात किती भुरळ पाडतात. मी मोदीजींना पत्र पाठवलं तुम्ही चहा विकत होते त्या चहामध्ये तुम्ही किती नफा घेत होते. एवढ्याशा चहा मध्ये तुम्ही अर्ध दूध अर्ध पाणी टाकत होते, असे म्हणत बच्चू कडू यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली.
लाडक्या बहिणींचे मत पाहिजे होतं म्हणून पैसे दिले
लाडक्या बहिणींना परिस्थिती पाहून नाहीतर मत पाहिजे होतं म्हणून पैसे दिल्याचे कडू म्हणाले. गुलाबराव म्हणतात गावात येऊन दाखवा, मी गावात गेलो वेशीवरुन परत आलो. त्यांनी माझा पाहुणचार करुन ठेवला होता, मी त्यांना सांगितलं विदर्भाचा ठेचा भाकर घेऊन येतो कर्जमाफी झाल्यानंतर. कापसाच्या ऐवजी गुलाब लावत जा, कमळ वाल्यांबरोबर गुलाब चांगला दिसेल असा टोला क़डू यांनी लगावला. रोज 15 ते 20 आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहेत. स्वातंत्र्याच्या लढ्यात देखील एवढे गेले नसतील तेवढे या व्यवस्थेने मारले आहेत. एका जिल्हा परिषदेच्या तिकिटासाठी लोक आपल्याला गुलाम करत असेल तर लाथ मारा. टीव्हीवरचा धिंगाणा जर बघितला जाती-धर्माच्या पलीकडे दिसत नाही.
माझा शेतकरी पेटून उठला तर सरकार एका दिवसात तालावर येईल
इकडे पाय घासून पडण्यापेक्षा जो आम्हाला पाय घासरायला लावतो त्याला पाडा. त्यादिवशी तो कलेक्टर वाचला नाहीतर थोबाडीत वाजवली असती. आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये गेलो तर गुन्हे दाखल केले. असे साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत, आम्ही याला घाबरत नाही. थांबणारा बच्चू कडू नाही माझ्या आडनावातच कडू आहे. शरद जोशींना आपण विधानसभेत जोशी होते म्हणून पाडलं होतं. झेंडा कुठल्याही पक्षाचा असू द्या पण त्या झेंड्याला जो कापूस लागतो तो कापूस माझा शेतकरी बाप पिकवतो. माझा शेतकरी पेटून उठला तर सरकार एका दिवसात तालावर येईल. सत्तेतील लोक आमच्या शेतकऱ्यावर वार करत असल्याचे कडू म्हणाले. .
महत्वाच्या बातम्या:
दादाची ‘दादागिरी’ सत्तेसाठीच, गोट्या खेळूनच तुम्ही दोनवेळा शपथ घेतली, लाडक्या बहिणींना का बदनाम करता? शक्तिपीठ कोणी मागितला? बच्चू कडूंचा सडकून ‘प्रहार’
आणखी वाचा
Comments are closed.