राज्यात 2 उपमुख्यमंत्री, कार्तिकीची पूजा कोण करणार?; पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर समितीपुढे प्रश्न,
पांडपूर कार्तिकी एकादशी 2025: आषाढी झाल्यानंतर आता कार्तिकी एकादशीची तयारी सुरू झाली आहे. मात्र यंदाच्या कार्तिकी एकादशीला (Pandhapur Kartiki Ekadashi 2025) दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणते उपमुख्यमंत्री पंढरीच्या पांडुरंगाची पूजा करणार या प्रश्नाचं कोडं विठ्ठलाला म्हणजेच मंदिर समितीला पडलंय.
आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकी एकादशीची महापूजा (Kartiki Ekadashi) उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा विठ्ठल मंदिरात आहे. मात्र राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याने कार्तिकीची पूजा शिवसेनेचे एकनाथ शिंदे की राष्ट्रवादीचे अजित पवार? यापैकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायची याची विचारणा आता मंदिर समिती विधी व न्याय विभागाकडे करणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री दोन, पण पुजेचा मानकरी कोण? अशी चर्चा पंढरीत होतेय.
मागची काही वर्ष कोणी पुजा केली? (Who Kartiki Ekadashi puja in the last few years?)
- यापूर्वीही 2023 मध्ये राज्यात देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार हे दोन उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली होती.
- गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये कार्तिकी यात्रा काळात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने उपमुख्यमंत्र्यांच्या ऐवजी पुणे येथील विभागीय आयुक्त कुलकुंडवार यांच्या हस्ते कार्तिकीची महापूजा झाली होती.
- याही वर्षी कार्तिकी यात्रा काळात जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता राज्यात लागण्याची शक्यता असून अशावेळी निवडणूक आयोगाच्या विशेष परवानगीने उपमुख्यमंत्र्यांना पूजा करता येऊ शकणार आहे.
- यापूर्वीही 2017 मध्ये जिल्हा परिषदेची आचारसंहिता असताना चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची महापूजा झाली होती. त्याच पद्धतीने जरी आचारसंहिता लागली तरी निवडणूक आयोगाच्या परवानगीने उपमुख्यमंत्र्यांना पूजा करता येणार आहे. यात नेमके कोणते उपमुख्यमंत्री कार्तिकी एकादशीची महापूजा करणार याचा निर्णय मात्र शासन अर्थात विधी व न्याय विभागाकडून होणार आहे. या निर्णयानंतर मंदिर समिती संबंधित उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यासाठी जाईल.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
Comments are closed.