नाशिकमध्ये बॅनरबाजी करत इन्स्टावर ‘दबंगगिरी’ करणाऱ्या सराईतांना पोलिसांचा दणका; गुंडांच्या सोशल
नाशिक गुन्हेगारी बातम्या: नाशिक शहरातील वाहतूक बेटांवर, दिशादर्शक फलकांसमवेत मुख्य चौकांत पुन्हा भडकलेल्या बॅनरबाजीमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींची ‘चमकोगिरी’ वाढत असल्याच्या निष्कर्षावर पोलीस आयुक्तालयाने ठोस पावले उचलली आहेत. आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी शहर बॅनरमुक्त करण्यासाठी आदेश दिले असून, यानुसार काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल केले गेले आहेत.
पोलिसांनी राकेश कोष्टी, गणेश वाघ व कुंदन परदेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे आरोप मुख्यतः महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण प्रतिबंध कायदा अंतर्गत आहेत, कारण त्यांनी सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी बॅनर लावले असल्याचा तक्रार करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, राकेश कोष्टी आणि त्याच्या साथीदारांनी गणेश उर्फ आप्पा सुरेश वाघ, अजय आठवले, मंगेश पांजंगे यांच्या विरोधात गुन्हेगारी वर्तनाचे व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल केले असल्याचे स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे अंबड भागातील त्रिमूर्ती चौक, दिव्या अॅडलॅब परिसर, पवननगर इत्यादी भागात गणेश व राकेश यांचे बॅनर झळकत असल्याचे पोलिसांनी निरीक्षण केले आहे.
Nashik Crime News: कोष्टीच्या बॅनरवर राजकीय आशय
कोष्टीच्या इन्स्टाग्राम खात्यावर “जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे माथाडी कामगार आघाडी, नाशिक” असा उल्लेख आहे. पोलिसांची माहिती आहे की, कोष्टीविरुद्ध सन 2006 पासून खुनासह विविध गंभीर गुन्हे नोंदले गेले आहेत. त्याने इन्स्टाग्रामवर गुन्हेगारी संदर्भातील पोस्ट करत समाजात भय निर्माण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सदर व्यक्ती सध्या मध्यवर्ती कारागृहातून जामीनावर बाहेर आहे.
Nashik Crime News: नाशिकमधील बॅनर प्रकरणे
– कुंदन सुरेश परदेशी हा खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा झालेला आरोपी असून त्याने पंचवटी पोलिसांच्या हद्दीतील मखमलाबाद रोडवरील हनुमानवाडी, ड्रिम कॅसल सिग्नलजवळ स्वतःचे बॅनर लावून दहशत पसरविली.
– सुशांत शांताराम नाठे या सराईताने आङगाव पोलिसांच्या हद्दीतील कोणार्कनगर येथील साक्षी फ्लोअर मिलजवळ विनापरवाना व अवैधरित्या सार्वजनिक ठिकाणी स्वतःचे बॅनर झळकावले.
– सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी व गणेश सुरेश वाघ यांनी अंबड पोलीसांच्या हद्दीतील महाकाली चौक येथे अवैधरित्या सार्वजनिक ठिकाणी स्वतःचे बॅनर लावून दहशत पसरविली.
– राकेश सोनार याने सातपूर पोलिसांच्या हद्दीतील जाधव कॉलनीतील दत्तमंदिर चौकाजवळ अवैधरित्या स्वतःचे बॅनर लावले.
– दिनेश जगन जाधव व बाळा जगन जाधव या सराईतांनी नाशिकरोड पोलिसांच्या हद्दीत स्वतःचे बॅनर लावून विद्रुपीकरण केले.
– करण शलपाल पारचे या फर्नाडीसवाडीतील सराईताने रेजिमेंटल प्लाझा कॉर्नरजवळील रिक्षा स्टॅन्ड येथे बॅनर लावून दहशत माजविली.
– अंबड हद्दीत बाळा मुरलीधर नागरे (रा. नागरे मळा, पिंपळगांव बहुला) या सराईताने, 2 सप्टेंबर रोजी म्हाडा कॉलनीतील जाधव संकुल येथे महादेव फाउंडेशन प्रणित शिल्पकार युवक मित्र मंडळाचा बॅनर लावून विद्पीकरण करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.
– म्हसरुळ हद्दीत अमोल किशोर फल्ले (वय २५, रा. बालाजी विहार, गामणे मळा मखमलाबाद) या सराईताने 4 सप्टेंबर रोजी किशोर सूर्यवंशी मार्गावरील ओमकार चौक येथे शुभेच्छांचे बॅनर लावून दहशत पसरवली.
Nashik Crime News: …तर गुन्हा दाखल होणार
दरम्यान, महापालिकेने निश्चित केलेल्या जागेव्यतिरिक्त इतरत्र कोणत्याही स्वरुपाचे बॅनर नसावे, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. वाढदिवसांसह इतर कार्यक्रमांच्याही बॅनरला ‘कात्री’ लावण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यातच वाढदिवसांच्या शुभेच्छांसाठी ‘भाऊ, दादा’ व गुन्हेगारांचे बॅनर असल्यास त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद होणार आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.