आऊट होताच पृथ्वी शॉचा पारा चढला, भर मैदानात मुशीर खानला बॅटने घेऊन मारायला धावला, नेमकं काय घडल


पृथ्वी शॉ विरुद्ध मुशिर खान का लढा द्या: पृथ्वी शॉची कारकीर्द मैदानापेक्षा जास्त वादांनी वेढलेली आहे. अलिकडेच पृथ्वी शॉचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पृथ्वी शॉ मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील सामन्यादरम्यान संतापलेला दिसत आहे. मंगळवारी (7 ऑक्टोबर) पुण्यात झालेल्या या सामन्यात शॉ आपल्या जुन्या मुंबईतील सहकाऱ्यांशी वाद घालताना दिसला. रणजी हंगाम 2025-26 पूर्वी सुरू झालेल्या या सामन्यात तो महाराष्ट्रकडून खेळत आहे. पृथ्वी शॉ 181 धावांवर बाद झाल्यानंतर मुशीर खानकडे रागाने धावांत गेला. त्याला फाईन लेगवर कॅच करून मुशीर खाननेच बाद केले होते. दोघांमधील वादाचे कारण आता क्रिकबजच्या अहवालातून समोर आले आहे.

आऊट होताच पृथ्वी शॉचा पारा चढला…

अहवालानुसार, पहिल्याच दिवशी (7 ऑक्टोबर) सततच्या स्लेजिंगमुळे चिडलेल्या शॉने मुशीरकडे बॅट उचलण्याचा आणि त्याचा कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला. ही घटना पुण्यातील एमसीए स्टेडियमवर झालेल्या तीन दिवसीय सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी घडली. शॉने यासामन्यात 220 चेंडूंवर 21 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने शानदार 181 धावा केल्या. पण ही घटना शॉ बाद झाल्यानंतर लगेच घडली, तेव्हा महाराष्ट्राचा स्कोअर 430/3 होता. 74व्या षटकात मुशीर खानच्या गोलंदाजीवर इरफान उमैरने फाईन लेगवर त्याचा कॅच घेतला.

पृथ्वी शॉ आणि मुशीर खान यांच्यात वाद का झाला? Inside माहिती समोर

शॉ बाद झाल्यानंतर मुशीरने त्याला ‘Thank you’ म्हणत निरोप दिला, त्यावरून शॉ भडकला आणि दोघांमध्ये बाचाबाची झाली. व्हिडिओ फुटेजमध्ये मैदानावरील पंच शॉला शांत करताना आणि त्याला मुंबईच्या खेळाडूंपासून दूर नेताना दिसतात. पृथ्वी शॉने 2016-17 हंगामात मुंबईकडून फर्स्ट-क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 2018-19 मध्ये अवघ्या 18व्या वर्षी टेस्ट पदार्पण केले. मात्र, मागील हंगामानंतर त्याने मुंबई संघ सोडून महाराष्ट्रात प्रवेश केला.

महाराष्ट्राच्या कर्णधाराचा शॉच्या बाजूने बचाव

महाराष्ट्राचा कर्णधार अंकित बावने म्हणाला की, “हा एक सराव सामना आहे. सर्व खेळाडू एकमेकांचे जुने चांगले मित्र आहेत. अशा गोष्टी कधी कधी घडतात. आता सर्व काही ठीक आहे आणि काहीही वाद नाही.” आता तरी मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) किंवा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MACA) यांनी या प्रकरणात कोणतीही पुढील कारवाई केलेली नव्हती.

अनेक वेळा वादांमध्ये सापडला पृथ्वी शॉ

पृथ्वी शॉ अनेक वेळा वादांमध्ये सापडला आहेत. वादांशी त्याच जुना नाते असल्याचेच म्हणावे लागेल. काही वर्षांपूर्वी त्याचा एका यूट्यूबरसोबतही वाद झाला होता. त्या घटनेचा व्हिडिओही समोर आला होता, ज्यात शॉ रस्त्यावरच मारामारी करताना दिसत होते. या प्रकरणात त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. शॉ सध्या बराच काळ टीम इंडियाच्या बाहेर आहे. आता तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच आयपीएल 2025 च्या मेगा लिलावातही त्यांना कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते.

हे ही वाचा –

Womens World Cup 2025 : लाजिरवाणी कामगिरी, सलग तीन पराभव, तरीही बाहेर गेला नाही पाकिस्तान! अजूनही जिवंत आहे सेमीफायनलचं स्वप्न, जाणून घ्या समीकरण

आणखी वाचा

Comments are closed.