समाजा-समाजातील आजची दुही, विसंवाद अन् संघर्ष, या पापाचे धनी शरद पवार; विखे पाटलांची प्रखर टीका
बुलढाणा : समाजा-समाजात आज दुही, विसंवाद आणि संघर्ष निर्माण झाला आहे, त्या पापाचे धनी शरद पवार आहेत, अशी प्रखर टीका भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विके पाटील (राधाकृष्ण यांनी केली आहे. सन 1994 साली जर पवार साहेबांनी मराठा समाजाचा समावेश केला असता तर आजची परिस्थिती नसती, असेही विखे पाटील यांनी म्हटलं. मराठा आरक्षणाच्या जीआरवरुन सध्या ओबीसी समाज आक्रमक झाला असून उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. नुकतेच या याचिकेवरील सुनावणीवेळी सरकारने काढलेल्या 2 सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयाला (Maratha) स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिला. त्यानंतर, ओबीसी नेत्यांनी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं.
भाजप नेते आमि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज बुलढाणा दौऱ्यावर असताना त्यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण संदर्भात सुरू असलेल्या वादावर भाष्य केलं. यावेळीमनोज जरेंग पाटील यांच्या सुरात सुर मिसळत त्यांनी थेट शरद पवांवर प्रखर टीका केली. सध्या हैदराबाद गॅझेटिअरनुसार ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम सुरू आहे. मात्र, मला ओबीसी बांधवांना हा प्रश्न विचारायचा आहे की, तुम्हाला आरक्षण देताना मराठा बांधवांनी कधी विरोध केला होता का? 1994 साली शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी हे पाप करून ठेवलं आहे. त्याचवेळी जर मराठा समाजाचा समावेश केला असता तर आज समाजात दुही, विसंवाद व संघर्ष राहिला नसता. या पापाचे धनी कोण? या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी शरद पवार साहेबांना विचारायला हवंअसे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं?
संजय राऊतांना महत्त्व देत नाही (Sanjay raut buldhan)
संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. संजय राऊत हा बांग देणारा कोंबडा आहे. त्यांच्या पक्षाने त्यांना दररोज सकाळी बांग देण्यासाठी ठेवलं आहे. सामना हा पेपर फार जास्त लोक वाचत नाहीत. त्यामुळे सामना काय म्हणतो याला महत्त्व नाही, सरकारने शेतकऱ्यांना भरीव पॅकेज दिलं आहे, असे म्हणत विखे पाटील यांनी संजय राऊत यांच्या टीकेला अधिक महत्त्व देत नसल्याचं म्हटलं?
घायवळ प्रकरणावर विखे पाटलांची अभिप्राय ( राधाकृष्ण विके पाटील चालू हॅमस्ट्रिंग))
सचिन घायवळ हा काय व्यक्ती आहे, तुम्हाला माहित नाही. जर पोलिसांनी त्याची शिफारस केली असेल किंवा नसेल. या परिस्थितीवर गृहराज्यमंत्र्यांनी खुलासा केला आहे. विरोधकांचं काम एकच आहे, फक्त काही झालं तर राजीनामा मागणे, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी घायवळ शस्त्र परवाना प्रकरणावर दिली.
हेही वाचा
विधिमंडळातील बड्या नेत्यानं योगेश कदमांना सांगितलं; घायवळ बंदुक प्रकरणावर रामदास कदमांचा गौप्यस्फोट
आणखी वाचा
Comments are closed.