फडणवीसांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी पोलिसांनी भाजपच्याच नेत्याला उचललं; मामा राजवाडेंची 10 तास चौकश
नाशिकमधील देवेंद्र फड्नाविस: उत्तर महाराष्ट्रात विरोधकांना औषधालाही शिल्लक ठेवायचे नाही या इराद्याने भाजपने नाशिकमध्ये कोणतीही पार्श्वभूमी न पाहता मिळेल त्या नेत्याला पक्षात घेण्याचा सपाटा लावला होता. या इनकमिंगमध्ये अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांनाही भाजपमध्ये (BJP) पावन करुन घेतले होते. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी पोलिसांकडून याच नेत्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. बरीच दिव्य पार पाडून भाजपमध्ये प्रवेश केलेले मामा राजवाडे (Mama Rajawade) यांची गुरुवारी नाशिक पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली. नाशिक गुन्हे शाखेने मामा राजवाडे यांना जवळपास 10 तास चौकशीसाठी बसवून ठेवले होते. गंगापूर रोड परिसरातील एका गोळीबार प्रकरणात मामा राजवाडे यांची चौकशी करण्यात आल्याचे समजते. या गोळीबार प्रकरणात मामा राजवाडे यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांनी (Nashik Police) त्यांची व्यवस्थित चौकशी केली. मामा राजवाडे हे नुकत्याच भाजपमध्ये गेलेल्या सुनील बागुल यांचे निकटवर्तीय आहेत. (Nashik News)
सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी भाजप गुन्हेगारांना पक्षात प्रवेश कसा देते, यावरुन बराच गदारोळ झाला होता. गंगापूर रोड गोळीबार प्रकरणात सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल याला अटक करण्यात आली आहे. तर इतर आरोपी फरार आहेत. जुन्या वादातून दोघांवर गोळीबार करत मारहाण केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मामा राजवाडे हे यापूर्वी ठाकरे गटात महानगरप्रमुख होते. मात्र, पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चा होती. परंतु, आता भाजपमध्ये येऊनही मुख्यमंत्री फडणवीसांच्या स्वागताची तयारी करण्याऐवजी त्यांना चौकशीला सामोरे जावे लागले. शुक्रवारची सकाळ उजाडली तरी पोलिसांनी मामा राजवाडे यांना घरी सोडले नव्हते. मामा राजवाडे यांना क्राईम ब्रँचने दाखवलेल्या या पोलिसी खाक्याची सध्या नाशिकच्या राजकारणात प्रचंड चर्चा रंगली आहे.
Nashik Crime: सातपूर गोळीबार प्रकरणी दोघांना अटक
गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारी घटनांमुळे नाशिक चर्चेत आले आहे. नाशिक सातपूर गोळीबार प्रकरणात नाशिक पोलिसांनी लोंढे टोळीतील आणखी दोघांना अटक केली आहे. गोळीबार प्रकरणी पवन पवारसह इतरांचा शोध सुरु असून पोलिस फरार गुन्हेगारांच्या मागावर आहेत. देवेश शिरताटे, शुभम गोसावी यांना अशी दोघांची नावे, दोघेही सराईत गुन्ह्यातील आरोपी असल्याची माहिती आहे. सातपूर गोळीबार प्रकरणात आरपीआय नेते प्रकाश लोंढे आणि दिपक लोंढेसह दोघे चार दिवसांच्या पोलीस कोठडीत आहेत. नाशिकमधील गुन्हेगारीनंतर नाशिक पोलिसांची राजकीय वरदहस्त असलेल्यांवर कारवाई सुरु असल्याची चर्चा आहे.
https://www.youtube.com/watch?v=VPQZOEYMQXK
आणखी वाचा
सुनील बागुल, मामा राजवाडे आज ‘पवित्र’ होणार, मोठं शक्तीप्रदर्शन करत कमळ हाती घेणार
आणखी वाचा
Comments are closed.