आमदाराला संग्राम जगतापांना कारणे दाखवा नोटीस; वादग्रस्त विधानावरून अजित पवार नाराज, वक्तव्यावर
पुणे : सोलापूर येथे झालेल्या हिंदू आक्रोश मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या (NCP) पक्षाचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केलेले विधान चुकीचे असून त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावणार आहे, असे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आमदार जगताप (Sangram Jagtap) यांनी ‘दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा,’ असं वक्तव्य केलं होतं. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांच्या पाहणीनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी जगतापांच्या (Sangram Jagtap) वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.
Sangram Jagtap Statement : अजित पवारांची नाराजी
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ‘पक्षाची ध्येय-धोरणे ठरल्यानंतरही पक्षाच्या विचारधारेपासून कोणताही खासदार-आमदार किंवा पक्षाशी संबंधित जबाबदार व्यक्ती, अशा प्रकारची वक्तव्ये करत असेल, तर ते पक्षाला मान्य नाही. अरुणकाका जगताप हयात होते, तोपर्यंत तेथे सर्व सुरळीत होते. संग्राम जगताप यांनी आता जबाबदारीने वागले, बोलले पाहिजे. एका कार्यक्रमात जगताप यांना अशा विधानांबाबत समज दिली होती. त्यावर सुधारणा करेन, असेही त्यांनी सांगितले. मात्र, अशा प्रकारची कोणतीही सुधारणा दिसत नाही,’ असं अजित पवारांनी म्हटलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांना नोटीस बजावण्याचा इशारा दिल्यानंतर, जगताप (Sangram Jagtap) यांनी पक्षविरोधी घेतलेली आक्रमक हिंदुत्वाची भूमिका आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. सध्या जगताप राज्यभर भाजपचे मंत्री नितेश राणे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सोबत विविध ठिकाणी आयोजित जनआक्रोश मोर्चांमध्ये सहभागी (Hindu Jan Akrosh Morcha) होत आहेत आणि तेथे प्रखर हिंदुत्ववादी भाषणे करत आहेत.त्यांच्या या भाषणांमधून स्पष्टपणे दिसते की जगताप आता पक्षाच्या भूमिकेपेक्षा भिन्न आणि अधिक तीव्र हिंदुत्वाचा अजेंडा पुढे नेत आहेत. यामुळे त्यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून पाठबळ मिळत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
बाबासाहेब पाटील यांनी शेतकरी आणि कर्जमाफीबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल बोलताना पवार अजित म्हणाले, ‘बळीराजाबाबत असे वक्तव्य करण्याचे काही कारण नाही. त्यांनी असे वक्तव्य केले असेल तर त्यांच्याशी बोलेन.
संगग्राम जगटॅप वीकेंट: तो जगण्यासाठी काय म्हणेल?
सोलापुरातील हिंदू आक्रोश मोर्चात बोलताना संग्राम जगताप म्हणाले होते की, दीपावली सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांनी खरेदी फक्त हिंदू लोकांच्याच दुकानातून करावी. आपल्या दीपावली खरेदीचा नफा केवळ हिंदू लोकांनाच मिळायला हवा. सध्या हिंदू मंदिरात अथवा हिंदूंवर होणारे हल्ले हे मशिदीमधून घडत आहेत.
Sangram Jagtap: जगतापांची वक्तव्यानंतर प्रतिक्रिया
जगतापांचीआपल्या वक्तव्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, त्यांनी धर्म विचारून मारलं. जर धर्म विचारून मारत असतील तर दीपावलीच्या आधी मी सांगितलं जर धर्म विचारून मारत असतील, तर खरेदी करताना सुद्धा आपण धर्म विचारून खरेदी करावी, असं आवाहन मी सर्वांना केलं, असंही जगताप म्हणालेत.
आणखी वाचा
Comments are closed.