‘मी घरातही सुरक्षित नाही, आधी कधी नाही पण आता सुरक्षेबाबत पहिल्यांदाच भीती वाटते’, सलमानची EX घ
मुंबई : अभिनेत्री संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) अलीकडे मोठ्या चिंतेत आहे. १८ जुलै रोजी त्यांच्या पुण्यातील फार्महाऊसमध्ये चोरीची घटना घडली होती. या घटनेत चोरट्यांनी घरात घुसून मोठे नुकसान केले, तसेच घरातील वस्तूंची तोडफोड करून रोख ५० हजार रुपये आणि ७ हजार रुपयांचा टीव्ही चोरला. या घटनेनंतर अभिनेत्री स्वतःच्या सुरक्षेबाबत फारच अस्वस्थ झाली असून तिने फायरआर्म (शस्त्र) परवान्यासाठी अर्ज केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, चोरट्यांनी केवळ चोरीच नाही तर फ्रिज, टीव्ही, फर्निचर फोडले आणि भिंतींवर अश्लील ग्राफिटी लिहिली. यामुळे अभिनेत्री हादरली आहे.(Sangeeta Bijlani) अ
संगीता बिजलानीने (Sangeeta Bijlani) नुकतीच पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची भेट घेऊन तपासाबाबतची माहिती घेतली. तिने सांगितले, “मी गेली २० वर्षे पवना येथे राहते आहे. हे माझं घर आहे. पण तीन महिन्यांपूर्वी झालेल्या या भयानक चोरीनंतरही अजून तोडगा निघालेला नाही. ही घटना अतिशय त्रासदायक आणि भयावह होती. सुदैवाने त्या वेळी मी घरात नव्हते.” अभिनेत्रीने पुढे सांगितले की, या घटनेने केवळ तिलाच नव्हे तर संपूर्ण परिसरातील नागरिकांना धक्का बसला आहे.
“पवना परिसरात अनेक ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबं राहतात. या घटनांनंतर सर्वजण असुरक्षित वाटत आहेत. त्यामुळे मी फायरआर्म परवान्यासाठी अर्ज केला आहे. एक महिला म्हणून, मी एकटी घरी असताना काही प्रमाणात सुरक्षा असणे गरजेचे आहे. आधी कधीच याची गरज भासली नव्हती, पण आता खूप असुरक्षित वाटत आहे,” असेही तिने म्हटलंय.
संगीता बिजलानीने पुढे सांगितले की, आपल्या सुरक्षेबाबत तिला पहिल्यांदाच भीती वाटते आहे आणि त्यामुळेच तिने शस्त्र परवाना घेण्याचा निर्णय घेतला आहे. संगीता बिजलानी ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री असून, तिने अनेक हिट चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. तिचे नाव एकेकाळी सुपरस्टार सलमान खानच्यासोबतही जोडले गेले होते. सध्या ती मनोरंजन क्षेत्रापासून दूर असली तरी या घटनेमुळे तिचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे.
जुलै महिन्यात घडलेल्या या घटनेत काही अज्ञात लोकांनी तिच्या फार्महाऊसमध्ये प्रवेश करून मोठी हानी केली होती. त्यांनी रेफ्रिजरेटर, टीव्ही, फर्निचर यासारख्या वस्तू फोडल्या आणि घरातील भिंतींवर अश्लील चित्रे काढली. इतकंच नव्हे तर 50,000 रोख आणि 7000 किमतीचा टीव्हीही चोरला गेला. या घटनेमुळे अभिनेत्री हादरली होती. संगीता बिजलानीने पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार दाखल केली होती. मात्र, घटनेनंतर जवळपास तीन महिने उलटूनही आरोपींचा शोध लागलेला नाही
आणखी वाचा
Comments are closed.