अनेकांनी माझी तक्रार केली पण मला एकनाथ शिंदेंचा फोन आलेला नाही – धंगेकर

पुण्यातील कोथरुड परिसरातील गोळीबारानंतर गुंड निलेश घायवळ (nilesh Ghaywal) आणि त्याचे कारनामे चर्चेत आले, त्याच्या पाठीशी राजकीय पाठबळ असल्याचा दावा काहींनी केला. तर शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर(Ravindra Dhangekar) यांनी याप्रकरणात भाजपविरोधात मोर्चा उघडला आहे. निलेश घायवळ (nilesh Ghaywal) ज्या पद्धतीने दादागिरी करतोय खोटा पासपोर्ट केला लोकांचे मुडदे पाडले किंवा समीर पाटील असेल ही सर्व लोक चंद्रकांत पाटील यांच्या आसपास असतात. यामुळेच त्यांचं धाडस होत चालला आहे, असा गंभीर आरोप धंगेकरांनी केला होता. त्याचबरोबर एबीपी माझाशी बोलताना रविंद्र धंगेकर म्हणाले, अनेकांनी माझी तक्रार केली पण मला एकनाथ शिंदेंचा (मराठी) फोन आलेला नाही.