महायुतीत दंगा नको, शिंदेंचा धंगेकरांना सल्ला; गुन्हेगारांना पाठीशी घालणार नसल्याचं आश्वासन


पुणे : कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर थेट आरोप करणाऱ्या माजी आमदार रवींद्र धंगेकरांना (रवींद्र धंगेकर) त्यांच्या पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्र्यांनी सल्ला दिला आहे. महायुतीत दंगा नको असा सल्ला एकनाथ शिंदेंनी (मराठी) धंगेकरांना दिला. त्याचवेळी पुण्यातील गुंडांना पाठीशी घातलं जाणार नाही असं आश्वासनही एकनाथ शिंदेंनी दिलं.

गुंड निलेश घायवळ प्रकरणावरुन (Nilesh Ghaywal Case) शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकरांनी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धंगेकरांच्या बॉसशी बोलतो असं म्हटलं होतं. त्यानंतर रवींद्र धंगेकरांनी आपण स्वतः शिंदेंची भेट घेऊ आणि बाजू मांडू अशी भूमिका घेतली.

पुण्यातील एका कार्यक्रमात रवींद्र धंगेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि आपली बाजू मांडली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना महायुतीत दंगा नको असा सल्ला दिला

रवींद्र धनगेकर: महायुतीत दंगा नको

रवींद्र धंगेकरांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुतीत दंगा नको असं रवींद्र धंगेकरांना सांगितलं. कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, सर्वसामान्यांना कोणताही त्रास होता कामा नये अशी भूमिका रवींद्र धंगेकरांनी मांडली होती. त्यावर आपण पुण्याला गुन्हेगारी मुक्त करू, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं आश्वासन दिलं. त्यावर पुण्याचे पोलीस आयुक्तांशी चर्चा केली.

सरकार म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेचं रक्षण करणे आमचं काम आहे. सर्वसामान्यांना कोणताही त्रास होता कामा नये अशीच आमची भूमिका आहे. तसेच पुण्यातील गुंडगिरीला पाठीशी घातलं जाणार नाही. गुन्हेगारांना क्षमा नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Ravindra Dhangekar On Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांनी लक्ष द्यायला हवं

मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निकटवर्तीय समीर पाटील याचा आणि घायवळचा थेट संबंध असल्याचा आरोप करत धंगेकरांनी चंद्रकात पाटलांकडे निर्देश केले होते. त्यानंतर महायुतीमध्ये नाराजी व्यक्त केली गेली. धंगेकर हे महायुतीत असल्याचा विसर पडला असा टोला अजित पवारांनी लगावला होता.

गुंड घायवळवरून चंद्रकांत पाटलांवर आपण आरोप केलेले नाहीत, मात्र त्यांच्या मतदारसंघात काय चाललंय याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं असं शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी सुनावलं. मी महायुतीत असल्याचा मला विसर पडलेला नाही असं प्रत्युत्तर त्यांनी अजित पवारांना दिलं.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.