संजय राऊतांमुळे मनसे नाराज, उलटसुलट चर्चांना उधाण येताच राऊतांचा राज ठाकरेंना मेसेज; नेमकं काय
संजय रौत राज ठाकरे: राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असताना मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि काँग्रेसबाबत (Congress) शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) केलेल्या वक्तव्यामुळे मनसेत (MNS) नाराजीचे सूर उमटले आहेत. “राज ठाकरे यांना काँग्रेस सोबत हवी आहे” असे विधान संजय राऊत यांनी केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Sanjay Raut: काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले होते की,स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की, आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेणे गरजेचे आहे. ही त्यांची एक भूमिका आहे. मात्र, याचा अर्थ तो निर्णय नाही. या राज्यात प्रत्येकाचे एक स्थान आहे. जसे शिवसेनेचे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, शरद पवार साहेबांचे, डाव्या पक्षांचे तसेच काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा पक्ष आहे. शिष्टमंडळात काँग्रेसचा समावेश होणे गरजेचं आहे. ही सर्वांचीच भूमिका असून राज ठाकरेंची सुद्धा तीच भूमिका आहे, असे त्यांनी म्हटले होते.
MNS on Sanjay Raut: मनसेची संजय राऊतांच्या वक्तव्यावर नाराजी
राज ठाकरे यांना काँग्रेस हवी आहे, या संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे मनसेच्या नेत्यांनी नाराजी केली आहे. आमच्या पक्षाची भूमिका आम्ही मांडू. काँग्रेसला आम्ही कोणताही प्रस्ताव दिला नाही,असे म्हणत मनसेच्या नेत्यांनी माध्यमांसमोर आपली नाराजी बोलून दाखवली.
राज ठाकरे यांना संजय राऊत संदेश: संजय राऊतचा संदेश राज ठाकरे यांना
या नाराजीनंतर संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना वैयक्तिक मेसेजद्वारे स्पष्टीकरण दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मी असे काहीही बोललो नाही. आपल्या वक्तव्याचा तो अर्थ नाही असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी राज ठाकरेंना दिल्याचे समजते.
Sanjay Raut Hospitalized: संजय राऊत रुग्णालयात दाखल
दरम्यान, संजय राऊत यांना मुंबईतील भांडुप (Bhandup) इथल्या फोर्टिज हॉस्पिटलमध्ये (Fortis Hospital) दाखल करण्यात आलं आहे. मागील आठवड्यात त्यांची ॲन्जिओग्राफी झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतरही संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीनगर दौरा केला होता. यावेळी त्यांना त्रास जाणवू लागला होता. आज पुन्हा फोर्टीस रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना अस्वस्थ जाणवत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. यापूर्वी 2019 मध्ये त्यांची ॲन्जिओप्लास्टी झाली होती. आज दिवसभर रुग्णालयात त्यांच्या विविध टेस्ट केल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
https://www.youtube.com/watch?v=rbrfffo0eni
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.