धक्कादायक! दोन कोटी 11 लाखांचे दागिने लंपास, अमरावतीत खळबळ, बडनेरा रेल्वे स्टेशनवर घडली घटना
अमरावती क्राइम न्यूज: अमरावती जिल्ह्यातील बडनेरा रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना घडली आहे. या रेल्वे स्टेशनवर दोन कोटी 11 लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बडनेरा रेल्वे स्टेशनवर सोमवारी सायंकाळी हावडा मुंबई मेल मधून जळगावमधील सोन्याच्या व्यापाऱ्याची दागिन्यांची सुटकेस चोरट्यांनी लंपास केली आहे. किशोर वर्मा असं सोना व्यापारीचं नाव आहे.
चोरट्यांनी तब्बल 2 किलो 600 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, वर्मा हे दागिन्यांची बॅग जनरल डब्ब्यातवरती ठेऊन बसले होते. काही मिनिटातच चोरट्यांनी त्याची बॅग लंपास केली आहे. चोरट्यांनी तब्बल 2 किलो 600 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. तब्बल दोन करोड 11 लाख रुपयांचे दागिने लंपास केल्यानं खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी बडनेरा रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पोलीस तपास करत आहेत.
नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टच्या दोन घटना उघडकीस
नाशिकमध्ये देखील दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. एका घटनेत ज्येष्ठ नागरिकाला 72 लाख रुपयांना लुटले तर दुसऱ्या घटनेत एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल 6 कोटी रुपयांना लुटल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे दोन्ही घटनेत भारताचे सर न्यायाधीश भूषण गवई यांच्या कोर्टात ऑनलाइन हजर करत असल्याचे भासवून भीती दाखवून पैसे उकळण्यात आले होते. घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी भीतीपोटी RTGS च्या माध्यमातून पैसे भरण्यास भाग पाडले आहे. 72 लाख रुपयांची ज्याची फसवणूक झालेल्या अनिल लालसरे यांना तुमच्या आधारकार्ड वरुन क्रेडिट कार्ड इशू झाले, त्याच्या माध्यमातून गैरव्यवहार झाला आहे. 72 लाख रुपयांचा दंड भरला नाही तर CBI चे पथक अटक करून दिल्लीला घेऊन येईल अशी दमबाजी करुन 74 वर्षीय वृद्धाला गंडा घालण्यात आला आहे.
सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे
तर दुसऱ्या प्रकरणात नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात राहणाऱ्या व्यक्तीला तुमच्या सिमकार्ड च्या माध्यमातून अश्लील फोटो व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तुम्हाला कोर्टात हजर करण्यात येत असल्याचे सांगून डिजिटल अरेस्ट करण्यात येऊन तब्बल 6 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या:
तब्बल 70 किलो चांदीची चोरी, आरोपीला उत्तर प्रदेशातून केली अटक, खडक पोलिसांची मोठी कामगिरी
आणखी वाचा
Comments are closed.