ठाणे महापालिकेचे लाचखोर उपायुक्त शंकर पाटोळेसह इतर दोघांना दिलासा; अटीशर्तीसह जामीन मंजूर
ठाणे क्राईम न्यूज : ठाणे महानगरपालिकेचे (Thane Municipal Corporation) लाचखोर उपायुक्त शंकर पाटोळे (Shankar Patole) यांच्या संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. एकीकडे या प्रकरणी शंकर पाटोळेच्या गळ्याभोवती ACB ने फास आवळायला केली सुरुवात केली आहे. ACB पाटोळे यांच्या मालमत्तेची चौकशी करणार आहे. पाटोळेच्या मूळ गावी जाऊन नातेवाईकांची देखील चौकशी होणार आहे. पाटोळेनी गेल्या तीन वर्षात एकूण किती माया जमवली याचा हिशोब होणार आहे.
अशातच शंकर पाटोळेसह या प्रकरणात गुंतलेले त्यांचे दोन सहकारी ओमकार गायकवाड आणि सुशांत सुर्वे यांनाही गुन्ह्यात आरोपी करण्यात आलं होतं. या प्रकरणी उच्च न्यायालयातून दाखल जामीन अर्जावर आता फक्त न्यायालयाने महत्वाचे निर्णय दिला असून तीनही आरोपींचा जामीन मंजूर केला आहे.
Thane Commissioner Shankar Patole : पुढील दोन महिन्यासाठी शंकर पाटोळे यांना ठाणे जिल्ह्यातून हद्दपार
ठाणे मनपाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यावर बिल्डरकडून 50 लाख लाचेच्या मागणीचा आरोप होता. यात त्यांचे दोन सहकारी ओमकार गायकवाड आणि सुशांत सुर्वे यांनाही गुन्ह्यात आरोपी करण्यात आले. ठाणे महानगरपालिकाच्या 43 व्या वर्धापन दिनाच्या दिवशी ACB ने सापळा रचून ओंकार गायकवाडला 10 लाख घेताना रंगेहात पकडले. आरोपींना 10 ऑक्टोबरला जामीन नाकारला, पण 17 ऑक्टोबर 2025 रोजी ठाणे महानगरपालिकेचे माजी उपयुक्त शंकर पाटोळे यांना उच्च न्यायालयातून जामीन मंजूर केला आहे.
1 लाख रुपयांच्या पी आर बॉण्डवर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. या सोबतच शंकर पाटोळे यांना दर सोमवारी मुंबई व ठाणे एसीबी कार्यालय येथे उपस्थित राहण्यासाठी कोर्टाने निर्देश दिले आहेत. तर पुढील दोन महिन्यासाठी ठाणे जिल्ह्यातून शंकर पाटोळे यांना हद्दपार करण्यात आलेले आहे. आरोपींवर कडक अटी लादण्यात आल्या असून चौकशी पूर्ण होईपर्यंत ठाण्यात प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणी न्यायालयाद्वारे निर्णय देत हा जमीन मंजूर केला आहे.
Thane Crime News : उच्च न्यायालयाकडून अटीशर्तीसह जामीन मंजूर
दरम्यान, या प्रकरणातील तीनही आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. फक्त यासाठी काही नियम व अटींची मर्यादा घालण्यात आली आहे.
अटी: 1. प्रत्येकीने ₹1,00,000 चा PR Bond आणि हमीदार द्यावा.
2.प्रत्येक सोमवार सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत ACB ठाणे येथे हजेरी द्यावी.
3.पुराव्याशी छेडछाड करू नये.
4.थेट किंवा अप्रत्यक्ष धमक्या देऊ नयेत.
5.दोन महिने ठाणे जिल्ह्यात प्रवेशबंदी, फक्त ACB हजेरीसाठी अपवाद.
6.आपला पत्ता व मोबाईल नंबर पोलिसांना द्यावा.
7.या निर्णयाचा अर्थ दोषी ठरविणे असा नाही.
थोडक्यात निष्कर्ष
•भ्रष्टाचार लाच प्रकरणात पकडलेले अधिकारी आणि त्यांचे सहकारी यांना जामीन मंजूर.
•संपूर्ण सापळा ACB ने रचला आणि आरोपींना रंगेहात पकडले.
•मात्र चौकशी पूर्ण होईपर्यंत कठोर अटींसह तात्पुरता जामीन देण्यात आला.
आणखी वाचा
Comments are closed.