राज ठाकरे सोडाच पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही, भाई जगतापांचा दावा; संजय राऊत म्हणाले..
भाई जगताप यांच्या वक्तव्यावर संजय राऊत आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत संदर्भात काँग्रेसचे (Congress) जेष्ठ नेते नेते भाई जगताप यांनी महत्वपूर्ण विधान केला आहे. काँग्रेस पक्ष हा ठाकरे बंधूंसोबत एकत्र लढणार नाही, असे मोठं वक्तव्य भाई जगताप यांनी केले. भाई जगताप हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे (Congress) निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात. ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आहेत. मुंबई काँग्रेसमध्ये भाई जगताप (Bhai Jagtap) यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे भाई जगताप यांच्या ठाकरे बंधूंसोबत लढणार नसल्याच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. परिणामी काँग्रेसने आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकप्रकारे स्वबळाची नारा दिला आहे.
दरम्यान याच मुद्दयांवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एका शब्दात प्रतिक्रिया देत या वक्तव्याला पूर्णविराम दिला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे सोडाच पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही. मी मुंबई काँग्रेसचा (Congress) अध्यक्ष असताना ही गोष्ट ‘डंके की चोट’ पर सांगितली होती. असे भाई जगताप यांनी सांगितलं असता, यावर संजय राऊतांनी ‘बोलूद्य त्यांना’ असे म्हणत या विषयावर अधिक बोलणं टाळलं आहे.
Sanjay Raut on Mahayuti : विकास निधी नव्हे तर ती लाच
शिवसेना (UBT) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आमदार निधी वाटपात (MLA Fund Allocation) भेदभाव केल्याचा गंभीर आरोप केला आहे. ‘पाच कोटी रुपये ही लाच आहे, मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही, आपापल्या आमदारांना दिलेले पाच कोटी ही एक प्रकारे लाच आहे,’ असे खळबळजनक वक्तव्य राऊत यांनी केले. त्यांनी म्हटले की, केवळ सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना निधी दिला जात आहे आणि विरोधी पक्षांच्या मतदारसंघांना जाणीवपूर्वक डावलले जात आहे. हे कृत्य पूर्णपणे घटनाबाह्य, बेकायदेशीर आणि लोकशाहीविरोधी कटकारस्थान असल्याचा आरोपही त्यांनी केला. निधी हवा असेल तर पक्षात या, असा दबाव आणून लोकशाही संपवण्याचा हा प्रकार सुरू आहे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रात राज्यपालांचे अस्तित्व केवळ भाजपचे हस्तक म्हणून असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. जनतेच्या पैशाचा वापर अशाप्रकारे केवळ आपल्या लोकांमध्ये करणे हा अहंकार आणि मस्तवालपणा असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.