महिला डॉक्टर बीडची मुंडे असल्याने वरिष्ठांनी तक्रार डावलली असेल तर गंभीर : धनंजय मुंडे


मुंबई : साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर आता आरोग्य आणि पोलीस व्यवस्थेविरोधात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. वरिष्ठांच्या दबावामुळे आणि पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या बलात्कारामुळे फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरने आत्महत्या केली. या प्रकरणी तिने पोलीस उप-अधीक्षकांकडेही तक्रार नोंदवल्याची माहिती समोर आली आहे. त्यावरूनच आता राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.

सदरची महिला डॉक्टर ही बीडची असल्याने आणि मुंडे असल्याने जर वरिष्ठांनी तिच्या तक्रारीची दखल घेतली नसेल तर ते गंभीर आहे. या प्रकरणी स्वतंत्र एसआयटी नेमण्यात यावी. तसेच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.

Dhananjay Munde Facebook Post : काय म्हटलंय धनंजय मुंडेंनी?

सातारा जिल्ह्यातील फलटण येथे रुग्णसेवेत असलेल्या व मूळच्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील महिला डॉक्टर यांच्याबाबत घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. माझ्या त्या डॉक्टर भगिनीला भावपूर्ण श्रद्धांजली. तिच्या अकाली निधनाने कुटुंबियांवर कोसळलेल्या दुःखात मी सहभागी आहे.

या घटनेतील दोषींना कठोर शासन व्हावे, तसेच ती मुंडे आहे व बीडची आहे म्हणून तिने केलेल्या तक्रारी वरिष्ठांनी डावलल्या असतील तर हे अतिशय गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र एस आय टी नेमून चौकशी करण्यात यावी तसेच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले जावे व दोषींना कडक शासन व्हावे, याबाबत उद्या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना पत्र देणार आहे.

Satara Doctor Suicide Case : नेमकं प्रकरण काय?

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रूग्णालयात एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली. मृत डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट आढळली आहे. या सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरने आपल्यावर बलात्कार झाल्याचं लिहिलंय. त्यात तिने पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेचं नाव लिहिलंय. पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदनेनं चारवेळा बलात्कार केल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. तसंच प्रशांत बनकर नावाच्या व्यक्तीनेही मानसिक त्रास दिल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटलंय.

आरोग्य विभागातील वरिष्ठ आणि पोलिसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्याचं पीडितीने आपल्या सुसाईट नोटमध्येस म्हटलं आहे. तसेच या प्रकरणी पोलीस उपाधिक्षांकडे तक्रार करुनही त्यांनी दखल घेतली नसल्याचं म्हटलं आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.