सोलापूरमध्ये भाजपचा स्वबळाचा नारा, भाजप आमदाराने मोठा बॉम्ब फोडला; महायुतीत नवा पेच निर्माण होण
सोलापूर बातम्या: सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या (Solapur Zilla Parishad election) पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय जवळपास निश्चित केला आहे. अक्कलकोटचे आमदार आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.
आमदार कल्याणशेट्टी म्हणाले की, “स्थानिक परिस्थिती पाहता कोणासोबतही युती करण्याची गरज नाही. भाजपकडे मजबूत संघटन आणि कार्यकर्त्यांची फळी आहे. त्यामुळे आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. भाजप कमळ चिन्हावर स्वबळावर लढवून सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत,” असे त्यांनी म्हटले.
Solapur News: जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्ह्यात महायुतीबाबत निर्णय घेणार
जिल्हा पातळीवर युतीबाबतचा अंतिम निर्णय सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे घेणार असल्याचेही कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले. “संघटनेचे जे प्रमुख आहेत, ते जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. पण सध्या आमची तयारी स्वबळावर लढण्याचीच आहे,” असे त्यांनी सांगितले.
Solapur News: अक्कलकोट तालुक्यात कोणाबरोबरही युती करणार नाही
अक्कलकोट तालुक्यातील परिस्थितीचा उल्लेख करताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, “अक्कलकोट तालुक्यात तीन नगरपालिका आहेत आणि त्या सर्व ठिकाणी आम्ही ताकदीने निवडणुकीत उतरणार आहोत. अक्कलकोट तालुक्यात आम्हाला युती करण्याची गरज नाही. पक्षश्रेष्ठींना मी याबाबत विनंती केली आहे की आम्ही तालुक्यात स्वबळावरच निवडणूक लढवू. अक्कलकोट तालुक्यातील ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर आमच्याकडे जनतेचा चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे आम्हाला युतीची आवश्यकता नाही,” असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. आमदार कल्याणशेट्टी यांच्या वक्तव्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील महायुतीच्या समीकरणांवर नवा पेच निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपने जर स्वबळावर निवडणुकीचा मार्ग स्वीकारला, तर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडू शकतो.
Mahadev Jankar on मराठी Ajit Pawar: महादेव जानकरांचा शिंदे, अजितदादांना सावध राहण्याचा इशारा
दरम्यान, सध्या राज्यात ऑपरेशन लोटसने जोर धरलेला असताना भाजपचे जुने सहकारी महादेव जानकर यांनी सडकून टीका करताना राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. आज आम्ही जात्यात आणि तुम्ही सुपात आहात. पण, तुम्हालाही जात्यात यायचे आहे हे लक्षात असू द्या, अशा शब्दात महादेव जानकर यांनी एकनाथ शिंदे आणि अजित दादा यांना सावध करायचा प्रयत्न केला आहे. काल रात्री सांगोला तालुक्यातील घेरडी येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यासाठी आले असता महादेव जानकर बोलत होते. यावेळी बच्चू कडू, माढ्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आयोजक आबा मोटे आदी मान्यवर उपस्थित होते. भाजपकडे आमदार येऊ लागताच ते म्हणतात तुम्हाला तुमचे आमदार सांभाळता येत नाहीत. आमदार सांभाळण्याची कुवत नसल्याचे बोलतात, अशी खंत देखील महादेव जानकर यांनी व्यक्त केली आहे.
Mahadev Jankar on Pankaja Munde: गोपीनाथ मुंडेंची वारसदार पंकजा मुंडे : महादेव जानकर
तर गोपीनाथ मुंडे यांच्या वारसदाराबाबत मंत्री छगन भुजबळांनी केलेले वक्तव्य खोडून काढताना गोपीनाथ मुंडे यांची पहिली वारसदार पंकजा मुंडे असून दुसरी प्रीतम तिसरी यशस्वी आणि चौथा वारसदार महादेव जानकर आहे, असे त्यांनी सांगितले. हे खुद्द स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी सभेत सांगितल्याचा दाखलाही महादेव जानकर यांनी दिला.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.