पंढरपूर टू बीड व्हाया सोलापूर…गेल्या 48 तासात PSI गोपाल बदने कुठं लपला? पोलीस ठाण्यात बसताच ढ
सातारा: फलटणमधील डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपीचा काल पंढरपुरात शोध घेतला जात होता. निलंबित पीएसआय गोपाळ बदणे (PSI Gopal badane Arrested) याच शेवटचं लोकेशन पंढरपुरात असल्याची माहिती मिळाली होती. शनिवारी रात्री गोपाळ बदणे याचं पंढरपुरात लोकेशन आढळल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी कसून शोध घेतला होता, अशातच आता गोपाळ पंढरपुरात होता, अशी माहिती आहे. काल पहाटेच्या सुमारास प्रशांत बनकर (PSI Gopal badane Arrested)पोलिसांना सापडला, त्याला पुण्यातील त्याच्या मित्राच्या फार्महाऊसमधून ताब्यात घेतलं त्यानंतर रात्री उशीरा बदणे फलटण पोलिस ठाण्यात हजर झाला.(PSI Gopal badane Arrested)
Phaltan Doctor Death: पंढरपूर टू बीड व्हाया सोलापूर…
डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाळ बदणे दोन दिवसात पंढरपूरहून सोलापूरला गेला होता. मग बीडला घरी जाऊन आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्याने काल रात्री उशीरा थेट पोलीस चौकीत हजेरी लावली. बदणे सोलापुरच्या काही पोलिसांच्या सोशल मीडियावरून संपर्कात होता, अशी माहिती आहे. बदणेच्या कुटूंबायांना त्याला हजर न झाल्यास नोकरीतून बडतर्फ करणार असल्याचं कळल्यानंतर बदणेला पोलीस चौकीत हजर झाला अशी माहिती आहे. हे यासंबंधीचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.
Phaltan Doctor Death: रात्री एकच्या सुमारास त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेलं
फलटण येथील डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणात आरोप असलेल्या पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदणे याने शनिवारी रात्री उशिरा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वत:हून सरेंडर केलं. रात्री जवळपास साडेबारा वाजता तो पोलीस ठाण्यात हजर झाला होता. यानंतर त्याला शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. रात्री एकच्या सुमारास त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेलं होतं. त्यानंतर पहाटे चार वाजता त्याला पुन्हा पोलीस ठाण्यात आणण्यात आलं.
Phaltan Doctor Death: पीएसआय बदणे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर ढसाढसा रडला
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, सरेंडर झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत पीएसआय बदणे याने तोंड उघडलं. तो तपास अधिकाऱ्यांसमोर ढसाढसा रडल्याची माहिती आहे. त्याने आपण महिला डॉक्टरवर कसल्याही प्रकारे अत्याचार केला नाही, असं पोलिसांना सांगितलं आहे. शिवाय त्याने इतरही काही गोष्टी पोलिसांना सांगितल्या. पण संबंधित डॉक्टरसोबत त्याचे काही संबंध होते का? किंवा दोघांच्या संमतीने लैंगिक संबंध ठेवण्यात आले होते का? याबाबत जेव्हा त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. त्याबाबत बदणेने अद्याप मौन बाळगल्याची माहिती आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.
आणखी वाचा
Comments are closed.