घर खरेदीचा विचार करताय, 2025 मध्ये या बँकांकडून सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज,जाणून घ्या


गृहकर्जाचे व्याजदर भारत 2025 मुंबई : भारतात मालमत्तेचे दर दररोज नवनवे विक्रम करत आहेत. प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की जीवनात एक घर खरेदी करावं. घरांच्य वाढत्या दरामुळं ते स्वप्न पूर्ण करण्यात अडचणी येतात. सातत्यानं घरांच्या किमती वाढत असल्यानं सर्वसामान्यांना घर खरेदी करणं अडचणीचं ठरु लागलं आहे. देशातील टियर -1 आणि टियर- 2 शहरातील घरांचे दर कोट्यवधी रुपयांवर पोहोचले आहेत. घर खरेदी करत असताना अनेकांना बँकांकडून गृह कर्ज घ्यावं लागतं. वेगवेगळ्या बँका विविध व्याज दरावर गृहकर्ज उपलब्ध करुन देतात. जर तुम्ही देखील घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला गृह कर्ज घेण्यापूर्वी सर्व बँकांच्या व्याज दरासंदर्भात माहिती असणं आवश्यक आहे. ज्यामुळं कोणतीही अडचण येणार नाही किंवा आर्थिक नुकसान सहन करावं लागणार नाही.

Home Loan : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे गृहकर्जाचे व्याज दर

जर तुम्ही सार्वजनिक बँकांकडून गृहकर्ज घेण्याचं नियोजन करत आहात तर तुम्हाला सार्वजनिक बँकांचे व्याज दर माहिती असणं आवश्यक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया 7.50 टक्के व्याज दरानं गृह कर्ज उपलब्ध करुन देतं. कॅनरा बँकेचा व्याज दर त्यापेक्षा कमी आहे. कॅनरा बँक 7.40 टक्के व्याज दरानं गृहकर्ज देते. पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, यूनियन बँक ऑफ इंडिया या तीन बँका 7.45 टक्के व्याजानं गृह कर्ज देतात. तर, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र गृहकर्ज 7.35 टक्के व्याजानं देतात. या सर्व बँकांच्या व्याजाची तुलना करुन तु्म्ही गृहकर्ज घेऊ शकता.

खासगी बँकांचे गृहकर्जाचे व्याज दर

जर तुम्ही खासगी बँकांकडून गृह कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर त्यांच्या गृहकर्जाच्या व्याज दरासंदर्भात तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. एचडीएफसी बँक गृहकर्ज 7.90 टक्के व्याजदरानं गृहकर्ज देतं. आयसीआयसीआय बँक 7.70 टक्के व्याज दरानं गृहकर्ज देतं. अॅक्सिस बँक 8.35 टक्के व्याजदरानं, आयडीबीआय बँक 7.55 टक्के व्याज दरानं गृहकर्ज देत आहे. येस बँक 9 टक्के व्याज दरावर गृहकर्ज देते.

गृहकर्जाचा व्याज दर रेपो रेटवर अवलंबून

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून वेळोवेळी रेपो रेट जाहीर केले जातात. आरबीआयनं रेपो रेट कमी केल्यास गृहकर्जाचे व्याज दर वाढतात. तर, आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास गृहकर्जाचे व्याज दर वाढवतात. 2025 मध्ये आरबीआयनं रेपो रेट कमी केल्यानं गृहकर्जाचे व्याज दर कमी झाले आहेत. जेव्हा आरबीआय रेपो रेट वाढवेल त्यानुसार गृहकर्जाचे व्याज दर देखील वाढू शकतील.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.