महायुती असतानाही नडले, शेवटी बिल्डरनेच जैन बोर्डिंगच्या जागेचा नाद सोडला; धंगेकरांची पहिली प्रत
पुणे जैन बोर्डिंग पुणे: पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट (Pune Jain Boarding) बरोबरचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. विशाल गोखले (Vishal Gokhale) यांनी जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय ई-मेलवरुन जैन ट्रस्टला कळवला आहे. जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या चेअरमन आणि ट्रस्टी यांना गोखलेंनी व्यवहार रद्द झाल्याचा ई-मेल केलाय. व्यवहारातील 230 कोटी रुपये परत देण्यात यावे अशी विनंतीही त्यांनी केलीय. धर्मदाय आयुक्तालय यांना सुद्धा पत्र पाठवून पूर्ण व्यवहार रद्द झाल्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे मेलमध्ये नमूद केलंय, तर नैतिकतेच्या मुद्द्यावर व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं गोखलेंनी म्हटलंय. जैन धर्मियांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या असंही गोखले म्हणाले.
पुण्यातील जैन बोर्डिंगच्या (Jain Boarding House) जमिनीच्या व्यवहारावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याप्रकरणी भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यावर एकामागून एक आरोप केले जात आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे मोहळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत असल्याचे दिसत आहे. मात्र रविंद्र धंगेकरांचे सर्व आरोप मुलरीधर मोहोळ यांनी फेटाळून लावले. त्यामुळे महायुतीमध्ये देखील विविध चर्चा रंगल्या होत्या. आता जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रविंद्र धंगेकरांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
रविंद्र धंगेकर काय म्हणाले? (Ravindra Dhangekar On Pune Jain Boarding)
दोन दिवसात जैन बोर्डिंगचा व्यवहार पूर्णपणे रद्द झाला तर मुरलीधर मोहोळ यांच्यासह सगळ्यांना जिलेबी भरवणार असं रविंद्र धंगेकर यांनी म्हटलंय. तर पुढील दोन दिवस मुरलीधर मोहोळ यांच्याबद्दल मी काहीही बोलणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं २ दिवसात तोडगा निघेल, त्यामुळे आनंदी असल्याचं धंगेकर म्हणाले. तसेच हा गतीमान आणि बोगस व्यवहार झाला, त्याची चर्चा संपूर्ण देशात झाली. विशाल गोखले यांनी ई-मेल पाठवला असेल तरी मला अद्याप विश्वास नाही. जोपर्यंत हा व्यवहार रद्द होत नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. आता ट्रस्टीच पळून गेले तर त्यांना कुठून पकडून आणणार. ट्रस्टींनी हा व्यवहार केला होता. खऱ्या अर्थाने विशाल गोखले खूप पैसेवाला नाही. तो पूर्वी लहान होता. पण 10-12 वर्षांत मुरलीधर मोहोळ पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष झाले तेव्हापासून विशाल गोखले यांची संपत्ती वाढत गेली. पण मला या विषयावर बोलायचं नाही. कारण मला एकनाथ शिंदेंनी सांगितले आहे की, यावर बोलायचं नाही. विशाल गोखले हा दिलेल्या भाकरीचा आणि सांगितलेल्या कामाचा आहे.
डॉन डे गप्प बसन- रवींद्र धंगेकर (रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदेवर)
विशाल गोखले खूप मोठा माणूस नाही. त्याला व्यवहार कोणी करायला सांगितला आणि नंतर कोणी काढायला लावलं यावर आपल्यलाा बोलायचे नाही. पण दोन दिवसांत हा व्यवहार कायदेशीरदृष्ट्या संपला पाहिजे. मी आता रात्रीही हा व्यवहार करणाऱ्या रजिस्ट्रारला आणू शकतो. तो कुठे राहतो, मला माहिती आहे. दोन दिवस मी गप्प बसेन, हा शब्द मी एकनाथ शिंदे साहेबांना दिला आहे. ते माझे नेते आहेत. त्यांच्या मानसन्मान ठेवणं माझं काम आहे. पण मी त्यांच्याकडून शब्द घेतला आहे की, मी चुकीचं वागणार नाही. पण चुकीचं घडत असेल तर मी बोलणार, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले.
जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार रद्द, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.