सारंगी महाजन म्हणाल्या, पंकजा बिघडली; आता प्रकाश महाजनांकडून जोरदार प्रहार, म्हणाले, तुम्हाला ल


सारंगी महाजन यांच्यावर प्रकाश महाजन : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात “गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार कोण?” असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. याच प्रश्नावर मुंडे कुटुंबातील नातलग सारंगी महाजन (Sarangi Mahajan) यांनी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) या दोघांवर जोरदार टीका केली आहे. “गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार हे बीड जिल्ह्यातील त्यांचे कार्यकर्ते आणि जनतेतील लोक आहेत. पंकजा आणि धनंजय मुंडे हे केवळ जमिनी लाटण्यासाठी एकत्र आलेले आहेत. माझी स्वतःची जमीनदेखील या दोघांनी बळकावली आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. तर गोपीनाथ मुंडे यांनी मुलीला घडवलं. पण, ही घडली नाही तर बिघडली, असे म्हणत सारंगी महाजन यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला. आता याच मुद्द्यावरून प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी सारंगी महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

प्रकाश महाजन एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, सारंगीला कधी दिसलं की पंकजा बिघडलेली आहे. तुम्ही जरा परळीला जाऊन पाहा. तुम्हाला लोक सांगतील पंकजा कशी बिघडलेली आहे. बोलताना तुमच्या हे लक्षात का आलं नाही की आपण काय बोलतोय? तुमचं रक्ताशी नातं नसेल. परंतु माझं आहे. त्या मुलीवर वडील गेल्यानंतर किती संकट आले. केवळ स्वार्थासाठी तुम्ही तिला बिघडलेली मुलगी म्हणतात. ज्या विश्वासाने  गोपीनाथ मुंडे यांनी सारंगी महाजन यांचे पती प्रवीण महाजन यांच्या नावावर विश्वासाने जमीन घेतली होती. त्या जमिनीबद्दल तुम्ही पंकजावर केस केली. केवळ महाजन आडनाव म्हणून लोक गप्प आहेत. धनंजय आणि पंकजाने ठरवल्यावर तुम्हाला वकील तरी मिळेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Prakash Mahajan on Sarangi Mahajan: तुम्हाला लाज वाटत नाही का?

प्रकाश महाजन पुढे म्हणाले की, गावोगावी पुस्तकांचा गठ्ठा घेऊन तुम्ही हिंडतात. कोणाला बदनाम करतात? ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे, त्याचा तुम्ही स्वाभिमान करता. तुम्हाला गोपीनाथ मुंडेंचा फोन गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा व्हिजा मिळतो. तुम्हाला प्रमोद महाजनने सांगितल्यावर अमेरिकेचा व्हिजा मिळतो. त्यावेळी तुम्हाला प्रवीण महाजन, गोपीनाथ मुंडे चालत होते. त्यांच्या मुलाची बदनामी करताना थोडी सुद्धा तुम्हाला लाज वाटत नाही का? असे म्हणत त्यांनी सारंगी महाजन यांच्यावर टीका केली आहे.

Sarangi Mahajan on Pankaja Munde: नेमकं काय म्हणाल्या होत्या सारंगी महाजन?

सारंगी महाजन यांनी म्हटले होते की, गोपीनाथ मुंडे हे मोठे नेते होते. त्यांचा वारसदार ही बीडची जनता आहे. बीडची जनता हे पहिले वारसदार आहेत. दुसरे वारसदार हे गोपीनाथ मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत. पंकजा, धनंजयची त्यांचे नाव घेण्याची लायकी नाही. गोपीनाथरावांच्या राजकारणासारखं राजकारण यांचं नाही. हे गोपीनाथ मुंडे यांच्या नावावर येऊन बसलेत. गोपीनाथ मुंडे यांनी मुलीला घडवलं. पण, ही घडली नाही तर बिघडली. ती जे दाखवते ते रिल्समध्ये दाखवते. ती  फक्त शोबाजी करते. खरं राजकारण नाही, असे म्हणत त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला. तर धनंजय मुंडे यांनी आपल्या बायकोला सांभाळावं. हा नालायकासारखं वागतोय, असे म्हणत त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती.

आणखी वाचा

Prakash Mahajan on Pramod Mahajan Death: प्रमोद महाजनांना का संपवलं? सारंगींच्या दाव्यानंतर प्रकाश महाजनांची सनसनाटी मुलाखत; 20 वर्षांनी नवा अँगल समोर

आणखी वाचा

Comments are closed.