पावसाचा धोका, सेमी फायनलमध्ये पाऊस पडला तर टीम इंडिया जाणार बाहेर? काय आहे समीकरण


मुंबईत IND-W विरुद्ध AUS-W सेमीफायनल : नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर आज बुधवार 30 ऑक्टोबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात (IND vs AUS Semi Final) महिला विश्वचषक 2025 सेमीफायनल सामना रंगणार आहे. हा रोमांचक नॉकआऊट सामना दुपारी 3 वाजता सुरू होईल. सात वेळा विश्वविजेतेपद पटकावलेल्या ऑस्ट्रेलियासमोर पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धाराने टीम इंडिया उतरणार आहे. मात्र भारतासाठी सध्या सर्वात मोठी अडचण प्रतिस्पर्धी नाही, तर हवामान आहे. मुंबईमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे.

सेमीफायनल दरम्यान हवामान कसं असेल? (IND vs AUS Semi Final Before Heavy Rain)

अहवालानुसार, भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनलदरम्यान पावसाची व्यत्यय येण्याची शक्यता आहे. AccuWeather च्या माहितीनुसार, नवी मुंबईत आज तापमान 25 ते 33 अंश सेल्सियस दरम्यान राहील. दिवसभर आभाळ दाटून राहणार असून, अधूनमधून पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळी 10 च्या सुमारासच शहराच्या अनेक भागांत हलका पाऊस झाला, तर किनारपट्टी भागात मुसळधार सरी आल्या आहेत. पुढील 24 तासांत मुंबईत 40 ते 70 मिमी पर्यंत पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पावसामुळे सेमीफायनल सामना रद्द झाला तर…. (IND vs AUS Semi Final match canceled due to rain)

जर सामना सुरू असताना पाऊस अखंडपणे सुरू राहिला, तरी भारतीय चाहत्यांनी काळजी करण्याची गरज नाही. आयसीसीने या सामन्यासाठी रिझर्व्ह डे (Reserve Day) ठेवला आहे. म्हणजेच, जर सामना आज (30 ऑक्टोबर) पूर्ण होऊ शकला नाही, तर तो उद्या (31 ऑक्टोबर) खेळवला जाईल.

पण 31 ऑक्टोबरलाही पाऊस झाला, तर?

जर सामना रिझर्व्ह डेपर्यंत गेला आणि 31 ऑक्टोबरलाही पावसामुळे खेळ होऊ शकला नाही, तर भारताला मोठा धक्का बसू शकतो. पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला थेट फायनलसाठी पात्रता (क्वालिफिकेशन) मिळेल, तर पावसामुळे टीम इंडिया बिना खेळता बाहेर पडेल.

भारत महिला संघ : शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, उमा छेत्री, अमनजोत कौर, राधा यादव, श्री चरणी, रेणुका सिंग ठाकूर, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, रिचा घोष, क्रांती गौड.

ऑस्ट्रेलियन महिला संघटना: जॉर्जिया वोल, फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, अलिसा हीली (टेनर), ॲनाबेल सदरलँड, ऍशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, जॉर्जिया वेअरहम, अलाना किंग, किम गर्थ, मेगन शट, हीदर ग्रॅहम, डार्सी ब्राउन, सोफी मोलिनक्स.

हे ही वाचा –

Asia Cup 2025 : भारतात आशिया कप ट्रॉफी कधी येणार? पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वींची आडमुठी भूमिका कायम,बीसीसीआयचा नवा प्लॅन

आणखी वाचा

Comments are closed.