अजित पवारांच्या तीन दशकांच्या वर्चस्वाला आव्हान; ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीवरून महायुतीत लढाई


महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणूक: महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या (MOA) अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून महायुतीमध्येच मोठी राजकीय लढाई सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol)अध्यक्षपदासाठी आमनेसामने उभे ठाकले आहेत. ‘अध्यक्ष म्हणून मी देखील जबाबदार राहणार आहे,’ असा थेट इशारा देत देवेंद्र फडणवीसांचे माजी विशेष कार्यकारी अधिकारी संदीप जोशी (Sandip Joshi) यांनी अजित पवारांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून निशाणा साधला आहे. येत्या 2 नोव्हेंबरला ही निवडणूक होणार असून, अजित पवारांच्या तीन दशकांच्या वर्चस्वाला भाजपने आव्हान दिले आहे.

Sandip Joshi on Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे मतदारांवर दबाव टाकत आहे

तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांचे माजी विशेष कार्यकारी अधिकारी संदीप जोशी यांनी संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि दोन एफआयआर दाखल असल्याचे आरोप केले आहेत. तसेच, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे मतदारांवर दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. परिणामीमहाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आमने-सामने आली आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर यांच्या विरोधात अपहार केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर आता भाजपचे विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी थेट क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर आरोप केले. भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालणारा क्रीडामंत्री राज्याला नको असे म्हणत त्यांनी माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीहे केलीहे.

Maharashtra Olympic Association Election: अजित पवारांच्या तीन दशकांच्या वर्चस्वाला भाजपचे आव्हान

ऑक्टोबर – महाराष्ट्र ऑलिम्‍पिक संघटनेच्‍या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍या ऑलिम्‍पिक पॅनेलचे पारडे जड असल्‍याचे स्‍पष्ट झाले आहे. येत्‍या रविवारी होणाऱ्या एमओएच्‍या निवडणुकीत अजित पवार गटाचे 21 उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्‍यापैकी 3 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. मुंबईत दिनांक 2 नोव्‍हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्‍पिक संघटनेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ऑलिम्‍पिक पॅनलची घोषणा अर्जुन पदक विजेते अशोक पंडित आणि ध्यानचंद पदक विजेते प्रदीप गंधे यांनी केली आहे. 30 मतदार संघटनांपैकी 22 पेक्षा अधिक संघटनांनी अजित पवार यांना आपला पाठिंबा जाहिर केला आहे.

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍या  पॅनेलचे उमेदवार कोण?

अध्यक्ष – अजित पवार, वरिष्ठ उपाध्यक्ष – अशोक पंडित, उपाध्यक्ष – आदिल सुमारीवाला- (बिनविरोध निवड), उपाध्यक्ष- प्रदिप गंधे, (बिनविरोध निवड) उपाध्यक्ष – प्रशांत देशपांडे, (बिनविरोध निवड), उपाध्यक्ष – दयानंद कुमार , (बिनशर्त पाठिंबा) सचिव – नामदेव शिरगांवकर, सहसचिव – निलेश जगताप, उदय डोंगरे, मनोज भोरे, चंद्रजीत जाधव, खजिनदार – स्‍मिता शिरोळे, कार्यकारिणी सदस्य – संदिप चौधरी,संदिप ओंबासे,राजेंद्र निम्‍बाते, गिरीश फडणीस,रणधीरसिंग,किरण चौगुले,समीर मुणगेकर,संजय वळवी, सोपान कटके आदी.

हे हि वाचा

आणखी वाचा

Comments are closed.