सीएसएमटी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलकांचं ते ठरलं नव्हतं; अचानक घोषणाबाजी देत कामबंद करत लोकल
मुंबई : मुंब्रा रेल्वे अपघात (Accident) प्रकरणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका ठाणे रेल्वे (Railway) स्थानकातील प्रवाशांना बसला होता, बराच वेळ ट्रेन दादरला थांबून होत्या. त्यामुळे, मुलुंड आणि ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. गर्दीमुळे चार प्रवासी लोकल ट्रॅकवरुन जात असताना लोकलची धडक बसल्याने खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली यामध्ये तिघांचा मृत्यू झाला होता. दरम्यान,सीएसएमटी (CSMT) येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला (CSMT) लोहमार्ग पोलिसांची मूक परवानगी होती.
Mumbai CSMT Protest: ल्वे कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी देत कामबंद करत लोकल गाड्या थांबवल्या
या आंदोलनासंदर्भात रेल्वे कर्मचाऱ्यांनी फक्त लेखी पत्र CSMT लोहमार्ग पोलिसांना दिले होते. या पत्रानुसार संघटनेकडून फक्त शांततेत निषेध नोंदवून ते निषेध पत्र DRM यांना देणार असल्याचे कळवले होते, अशी माहिती समोर आली आहे.मात्र अचानक रेल्वे कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी देत कामबंद करत लोकल गाड्या थांबवल्या. याआधीही अशा अनेक आंदोलनाला लोहमार्ग पोलिसांनी मूक परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी देत असताना सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होणार नाही. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, कोणालाही हानी होणार नाही. प्रशासकीय कामात अडथळा निर्माण होणार नाही या अनुषंगाने देत असतं. त्यामुळे कालच्या आंदोलनाबाबत लोहमार्ग पोलिस आता वरिष्ठांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान कालच्या अपघताप्रकरणी CSMT लोहमार्ग पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Mumbai CSMT Protest: आंदोलन का करण्यात आलं?
मुंब्रा इथे झालेल्या अपघातात लोहमार्ग पोलिसांनी 2 अभियंत्यांवर गुन्हे दाखल केले, त्याच्या विरोधात रेल्वे कर्मचारी संघटनानी काल आंदोलन केलं. यामध्ये NRUM कडून संध्याकाळी मोर्चा काढण्यात आला, त्यानंतर लोकल देखील सोडण्यात आल्या नाहीत, मोटर मन देखील यात सहभागी झाले होते. मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सीएसएमटी स्थानकात उभ्या होत्या. रेल्वे प्रशासनाचे रेल्वे युनियन सोबत बोलणे सुरू आहे, लोकल सोडण्यात यव्या यासाठी बोलणी सुरू होती. रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांच्या माहितीनुसार काही वेळाने लोकल सुरू झाल्या. आंदोलकांसोबत बोलून गाड्या सुरु केल्या. डीआरएम, डीएम सरांसोबत बोलून हे आंदोलन थांबवण्यात आलं, असं स्वप्नील लीला यांनी सांगितलं.
जीआरपीनं अभियत्यांविरोधात दाखल केलेल्या केसच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. पावणे सहा पर्यंत गाड्या थांबल्या होत्या. पावणे सात वाजता पुन्हा लोकल सुरु झाल्या आहेत. त्यामुळं लोकल सेवा उशिरानं सुरु राहील, असं रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी सांगितलं.
Mumbai CSMT Protest: मुंब्रा अपघात प्रकरण काय?
9 जूनला मुंब्रा स्थानकाजवळ एक अपघात झाला होता. त्या अपघातात 5 जणांचा मृत्यू तर 9 जण जखमी झाले होते. त्या लोकल अपघाताचं कारण रेल्वे अभियंत्यांनी पावसामुळं खचलेल्या जागेचं काम वेळेत न करता दुर्लक्ष केल्यानं अपघात झाल्याचं एफआयरमध्ये म्हटलं होतं. या प्रकरणी दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. रेल्वेचे सिनियर सेक्शन इंजिनियर समर यादव आणि असिस्टंट डिव्हिजनल इंजिनियर विशाल डोळस यांनी दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
आणखी वाचा
Comments are closed.