धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या आरोपावर धनुभाऊंची पहिली प्रतिक्रिया
बीड: मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज jarange पाटील (मनोज जरांगे) यांनी पत्रकार परिषद घेत माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुनच रचण्यात आल्याचं jarange पाटील यांनी म्हटलं होतं. धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिलेली, अडीच कोटींची डील झाल्याचंही पाटील यांनी म्हटलं होतं. त्याच अनुषंगाने धनंजय मुंडे यांni परळी येथील जगमित्र कार्यालयातून पत्रकार परिषद घेत आरोपांचे खंडन केले. मी गेली 30 वर्षइ सामाजिक आणि राजकीय जीवनात आहे, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि अण्णांनी जात-पात (Maratha) पाहली नाही. मी आजवर कधीही जात पाहून काम केले नाही, असे म्हणत धनंजय मुंडेंनी मनोज jarange पाटील यांनी केलेल्या आरोपावर उत्तर देण्यास सुरुवात केली.
मी 5 वर्षे विरोधीपक्षनेते म्हणून काम केले, त्यावेळी मी मराठा आरक्षणासाठी सभागृह बंद केले. नगर जिल्ह्यातील कोपर्डीला मी पहिली भेट दिली, त्यावेळी आरोपीला अटक होईपर्यंत मी सभागृह चालू दिले नाही. बीड जिल्ह्यात 80 हजार कुणबी प्रमाणात मी वाटले. मनोज jarange यांचे उपोषणही मी सोडले आहे, 17 तारखेची सभा सोडली तर मी एकदाही त्याच्यावर आरोप केले नाहीत, असेही धनंजय मुंडेंनी म्हटले. तसेच, मनोज जरांगेना वाटते धनंजय मुंडे या पृथ्वीतलावर नसावेत. मराठा समाजाला ओबीसी की ईडब्लूएसमधून आरक्षण आहे, याचे उत्तर आणखी जरांगे यांनी दिले नाही. छत्रपती शिवरायांनी घालून दिलेली पद्धत लोक विसरत आहेत, आपल्याला सर्वांना एकत्र येऊन घडी पुन्हा बसवायची आहे, असेही धनंजय मुंडेनी म्हटले.
आता तयार झालेली पिलावळ कोणाची आहे, आम्हाला कोणीही काही बोललं तरी आम्ही गप्प बसतो, मला तर तलवार घेऊन मारायाला आले होते. सध्या ईडब्लूएस की ओबीसीमध्ये जास्त आरक्षण मिळतं हे समोरासमोर होऊन जाऊ द्या, तुम्ही हाके, वाघमारे यांना मारलं. तुम्ही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लाऊ नका इतकंच आमचं म्हणणं आहे. मी अनेकांना बाजूला जाऊन भेटतो, यातून काय कट रचला जातो, हे सगळे तुमचे कार्यकर्ते आहेत. पण, माझी अशी इमेज तयार केली जात आहे, असे धनंजय मुंडेंनी म्हटले.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.