तुझा पाय एकीकडे, हात एकीकडे अन्…; बीड तुरुंगातील ऑडिओ क्लिपनंतर मनोज जरांगे पाटलांचा संताप
धाराशिव: दिवंगत सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात तुरुगांत अटकेत असलेल्या वाल्मिक कराड (Walmik karad) आणि त्याच्या साथीदारांकडून कारागृहातील इतर कैद्यांना धमकावल्या जात आहे. बीडच्या कारागृहातील धक्कादायक प्रकार समोर आला असून वाल्मिक कराड गँगची दहशत पुन्हा वाढल्याची चर्चा रंगली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि इतर गुन्ह्यातील आरोपी शंकर शेप यांनी एका कैद्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. अझर अब्दुल रहमान पठाण असं मारहाण झालेल्या कैद्याचं नाव आहे. विशेष म्हणजे, या ऑडिओ क्लिपमध्ये मनोज जरंगे पाटील बीड यांचंही नाव संबंधिताने घेतलं आहे. त्यावरुन, जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त करत थेट इशारा दिलाय.
व्हायरल होत असलेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालण्याचा उल्लेख आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं बनलं आहे. आता, या ऑडिओ क्लिपवर जरांगे पाटलांनी देखील भूमिका मांडली आहे. बीड कारागृहातील व्हायरल ऑडिओ क्लिपसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका आक्रमकपणे मांडली. गोळ्या घालायचं लांब राहिलं तू फक्त मला बघून जा, असं आव्हानच जरांगे पाटलांनी दिलं आहे. तू गोळ्या घालायला तर फक्त ये त्याचे दुष्परिणाम काय असतील हे तुला मग समजेल, ही माज आणि मस्ती आहे. आमचा समाजही मोठा आहे, उद्रेक कशाला म्हणतात, रक्त सांडलं कशाला म्हणतात, हे आणखी एकदा संपूर्ण भारत बघेल, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी व्हायरल ऑडिओ संदर्भात भाष्य करताना वाल्मिक कराडसह गँगला थेट इशारा दिलाय.
तुझा पाय एकीकडे, हात एकीकडे आणि मुंडक एकीकडे असं झालेलं दिसेल, तू मला फक्त गोळ्या घालून दाखव. तुझं कुणीही राहणार नाही, आमची तेवढी मजबूत एकी आहे. तुमच्याजवळ गोळ्या असतील तर मराठ्याजवळही गोळ्या आहेत. तुम्ही जर गोळ्या घालून आमची लोक मारणार असाल तर आमच्याकडे कुऱ्हाडी आहेत, व येथे सगळं आहे, असे म्हणत जरांगे पाटलांचं नाव घेणाऱ्यांवर मनोज जरांगे पाटलांनी थेट पलटवार केलाय.
तू ये तुला त्यादिवशी कळेल आणि तुझा लाभार्थी टोळीचा मोरक्याही मरेल, तो कुठेही सापडू दे, मुंबईला सापडू दे, पुण्यामध्ये सापडू दे, त्याचेही त्या दिवशी तुकडेच होणार तेही मराठीच करून दाखवणार. मी मराठ्यांना संयमाने ठेवतो पण तुमची माज आणि मस्ती अशीच जर राहिली तर तुम्ही बियाला सुद्धा राहणार नाहीत. तू गोळ्या घालायला ये, त्य दिवशी तुला उद्रेक कळेल, असे जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
बीडमधील सगळे महसूल कर्मचारी बदला
मनोज जरांगे पाटलांनी बीडच्या तुरुंग अधिकाऱ्यांसंदर्भातही भाष्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, मला बीडमधील गुंडाराज संपवायचा आहे. मग, बीडमधील जेलर का बदलला? बीड जिल्ह्यातील सगळे पोलीस एकदा बदलून टाका, बीडमधील सगळे महसूल कर्मचारी एकदा बदला, अशी मागणी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.