माझं सरकार का गेलं? नेमकं काय होतं षडयंत्र? परभणीत उद्धव ठाकरेंनी सगळच सांगितलं, महायुतीवर टीका


उद्धव ठाकरे: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सध्या मराठवाड्या दौऱ्यावर आहे. आज त्यांनी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्याबरोबर महाविकास आघाडीचं सरकार पडण्यामागचं षडयंत्र काय होतं? यावरही भाष्य केलं. मुंबईच्या जवळ सगळे नियम धाब्यावर बसवून तेथील जमीन अदाणींना देण्यात आली आहे. त्यामुळं शक्तिपीठ का केलाय हे यातून कळेल असेठाकरे म्हणाले. तिथे अदाणी यांचा सिमेंट चा प्रकल्प होतोय.  अजित पवारांच्या पोरासाठी नियम बदलले. हे सरकार कपाळ करंटे असल्याची टीका देखील ठाकरेंनी केली. माझे सरकार पाडण्यामागे यांचे हेच षडयंत्र होते मी यांना कुठलेही असलं धंदे करुन दिले नाहीत, म्हणून त्यांनी सरकार पडल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

मी तुमच्याकडे विचारायला आलोय की सरकारी पॅकेजचे काय झाले. मी जेव्हा छत्रपती सभांजी नगर येथे मोर्चा काढला त्यानंतर सरकारने पॅकेज जाहीर केले होते.  आपली मागणी आहे कर्जमुक्ती आणि 50 हजार हेक्टरी मदत द्यावी असे ठाकरे म्हणाले. जमिनी खरडून गेल्यात आता शेतकऱ्यांनी माती आणायची कुठून? असा सवाल देखील ठाकरेंनी केला. तीन वर्ष जातील शेतकऱ्यांचे आता शेती पुन्हा उभी करायला. शक्तिपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांना नको आहे. शक्तिपीठ नाव गोंडस आहे. याचे नारळ फुटणार ते 86 हजार कोटी रुपयांना. 86  हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हा एक दीड लाख कोटींवर जाईल. याचे पैसे कुणाला जाणार असेही ठाकरे म्हणाले.

सातबारा कोरा कधी करणार सांगा?

सातबारा कोरा कधी करणार सांगा? असा सवालही ठाकरेंनी केला. मी जेंव्हा कर्जमुक्ती दिली तेव्हा तुम्ही कर्जमुक्त झाले होते का नाही? हे सरकार म्हणताय की आता बँकेचा फायदा होईल. हा बँकांचा फायदा कसा होईल हे यांनी सांगावे. जून पर्यंत बँका तगादा लावणार नाहीत का? शेतकरी भोळा आहे त्यांना माहिती आहे. शेतकरी काहीच करु शकत नाहीत त्यांना माहिती हे फक्त आत्महत्या करतात. झाल्या ना 900 षेतकरी आत्महत्या काय करायचे त्यांच्या कुटुंबियांनी असेही ठाकरेम्हणाले. ह्या सगळ्यां शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे पाप कुणाच्या डोक्यावर टाकायचे .सरकारच्या डोक्यावर टाकावे लागेल का नाही असेही ठाकरे म्हणाले.

सत्ता असती तर तुमच्यावर ही वेळ येवू दिली नसती

परभणीने आपला खासदार आणि आमदार निवडून दिला आहे. हेच जर राज्यात झाले असते तर शेतकरी आत्महत्या होवू दिल्या नसत्या असे उद्धव ठाकरेम्हणाले. भाजपमध्ये आले की भ्रष्टाचार मुक्त होतात. शेतकरी भाजपामध्ये आले तर करणार का शेतकऱ्यांचे कर्जमाफ? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. कोरडवाहू बागायती शेतीसाठी जे पैसे जाहीर केले त्यातले कुणाला काय पैसे मिळाले सांगा?  मला शेतीतील कळत नाही पण शेतकऱ्यांचे मन मला कळते असेही उद्धव ठाकरे म्हणाले.  हे सरकार दगाबाज यासाठी की जाहीर करताय आणि देत नाही. सत्ता असती तर तुमच्यावर ही वेळ येवू दिली नसती. तुमची कर्जमाफी करण्यासाठी सरकारला भाग पाडू असेही ठाकरे म्हणाले. एका शेतकऱ्याने मला सांगितले की हे सरकार रजाकारांचे आहे. त्यांच्या विरोधात कसे लढायचे हे मी मराठवाड्याला मी सांगावे. हा मराठवाडा लढावू आहे.  मी बोलतोय मुख्यमंत्री का बोलत नाहीयेत इथे येवून असेही ठाकरे म्हणाले. त्यांना बिहारला जायचे आहे तिथे जाऊन त्यांनी सांगायलं हवे होते की मी इथे कसा शेतकऱ्यांच्या कोपराला गूळ लावलाय असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी लगावला.  तुम्ही सगळ्यांनी वोट बंदी करा. आम्हाला कर्जमुक्त करणार नाहीत तोपर्यंत महायुतीला वोट बंदी करा असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

Uddhav Thackeray: या अ‍ॅनाकोंडाला आपल्याला कोंडावच लागेल, पक्ष चोरल्यानंतर मत चोरीही करत आहेत, यांची भूक क्षमतच नाही; उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर सडकून प्रहार

आणखी वाचा

Comments are closed.