बीडमध्ये सोन्यापेक्षा महागड्या पदार्थाची तस्करी, व्हेल माशाची 1.5 कोटींची उलटी जप्त


बीडमध्ये व्हेलची उलटी बीड शहरातील चऱ्हाटा फाटा येथे कारमधून व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी दीड कोटी रुपयांच्या जवळपास किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोन्यापेक्षाही महाग समजल्या जाणाऱ्या व्हेल माशाच्या उलटीची (whale vomit) विक्री करणारे दोघे बीड शहरात येत असल्याची गोपनीय माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर शहरानजीकच्या एका हॉटेलजवळ, चऱ्हाटा फाटा येथे सापळा रचण्यात आला. या दरम्यान दोघांना तातडीने ताब्यात घेण्यात आले. (Beed News)

या कारवाईत शैलेंद्र प्रभाकर शिंदे आणि विकास भीमराव मुळे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी या दोघांकडून दीड किलोच्या जवळपास वजनाची व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रीस) जप्त केली आहे. बाजारभावानुसार ज्याची अंदाजित किंमत दीड कोटी रुपयांच्या जवळपास आहे. या उलटीची वनविभागाकडून प्राथमिक तपासणी करण्यात आली असून, पुढील तपासणीसाठी ती आता प्रयोगशाळेत पाठवली जाणार आहे. पकडलेल्या दोघांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक बांगर यांनी सांगितले.

Beed Suicide Case: बीड नगर परिषदेच्या इमारतीच्या छतावर कर्मचाऱ्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला मृतदेह

बीड नगर परिषदेच्या इमारतीच्या छतावर एका कर्मचाऱ्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. अविनाश धांडे असे कर्मचाऱ्याचे नाव असून ते बीड नगरपरिषद वसुली विभागात कार्यरत होते. सकाळच्या सुमारास धांडे यांचा मृतदेह नगर परिषदेच्या इमारतीवरील एका शिडीला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून याचा पंचनामा केला जातोय. दरम्यान या घटनेचे कारण अद्याप समजू शकले नसून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Bhandara Crime News: भंडाऱ्याच्या खापा गावात दोन गटात तुफान राडा

भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील खापा गावात सुरू असलेल्या मंडईच्या लावणी कार्यक्रमादरम्यान क्षुल्लक कारणावरून काही तरुणांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि त्यानंतर रामटेक – गोंदिया या राष्ट्रीय महामार्गावरील खापा चौकात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या मारहाणीत चार जण किरकोळ जखमी झालेत. याची माहिती मिळतात तुमसर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळ गाठत मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेतलं तर काहींना तिथून हुसकावून लावलं. दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीमुळे खापा चौकात रात्रीला काही काळ तणावाचं वातावरण होतं. याप्रकरणी तुमसर पोलिसांनी गुन्हा दाखल करत एकाला ताब्यात घेतलं असून अधिक तपास आता सुरू आहे.

आणखी वाचा

मुंबईत एका पॉश सोसायटीत 27 वर्षीय मोलकरणीने उचललं टोकाचं पाऊल; पोलीस तपासात धक्कादायक कारण उघड

आणखी वाचा

Comments are closed.