नितेश राणेंचं वक्तव्य व्यक्तिगत, भाजपचा संबंध नाही; अल्पसंख्यांक आयोग नोटीस पाठवण्याच्या तयारीत


नागपूर : राज्य अल्पसंख्याक आलेगाकडून कॅबदिद्वारेटीमंत्री नितेश राणे यांना नोटीस पाठवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. नितेश नितेश राणे यांच्याकडून वारंवार मुस्लिम समाजाविषयी, अल्पसंख्यांकाविषयी द्वेष पसरवण्याची भाषा केली जात आहेत्यामुळे त्यांना नोटीस पाठवून विचारणा केली जाणार” असल्याचे समजते. नितेश राणे यांना नोटीस पाठवून अल्पसंख्यांक आयोग त्यांच्याकडे खुलासा मागणार आहे. तसेच, नितेश राणे यांनी कुंभमेळ्यात (kumbhmela) केवळ हिंदुंचीच दुकाने असावीत, मुस्लिमांना दुकाने नको, असे वक्तव्य केले होते ते त्यांचे व्यक्तिगत मत असून भाजपचा (BJP) त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनाही म्हटलं आहे.

सिंहस्थ कुंभमेळाव्यात मुस्लिमांना दुकान न देण्याचं नितेश राणे यांचं वक्तव्य त्यांना भोवण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री, मोहन भागवत, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे सर्व नेते मोठे सनातनी आहेत, पण त्यांनी कधीही अशी वक्तव्य केली नाहीत. त्यामुळे, नितेश राणे यांचं विधान वैयक्तिक असून भाजपचा त्याच्याशी काही संबंध नाही, असे प्यारेखान यांनी स्पष्ट केले. तसेच, नितेश राणे यांना अल्पसंख्यांक आयोगाकडून नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती आहे. कारण, नितेश राणे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसून येतात. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत त्यांना समजही दिली होती.

कुंभमेळ्यात हिंदूंनीच दुकाने लावावी – नितेश राणे

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दरम्यान हिंदूंनीच या कुंभमेळ्यामध्ये दुकानं लावावी, असे वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर असताना केले होते. त्यामुळे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदू कार्ड खेळण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा देखील सुरू झाली आणि या विधानानंतर एक नवा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, नितेश राणे यांच्या विधानानंतर नाशिकमधील साधू-महंतांकडून देखील या विधानाचे स्वागत करत याप्रकरणी सरकारनेच लक्ष घालावे आणि ज्याला हिंदू धर्म मान्य नाही, देव देवतांची पूजा मान्य नाही, अशा लोकांवर कुंभमेळ्याच्या काळात व्यवसायावर निर्बंध आणावे, अशी भूमिका घेतल्याचं दिसून आलं.

हेही वाचा

निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरा, नायतर बॅलेटपेपरवर घ्या, याचिकेवर सुनावणी; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

आणखी वाचा

Comments are closed.