दृश्यम बघून कट रचला; बायकोला संपवलं, भट्टीत जळलं अन् राख पाण्यात सोडली; पुण्याच्या शिक्षिकेसोबत


पुणे: पुण्यात चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीला अटक (Pune Crime News) करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर त्याने लोखंडी भट्टी तयार करून पत्नीचा मृतदेह जाळून टाकला.त्यानंतर तयार केलेली भट्टी देखील नष्ट करून टाकली. पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर तो स्वतः पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता (Pune Crime News) असल्याची तक्रार देण्यासाठी पोहचला.मात्र पोलिसांसमोर त्याचे बिंग फुटले आणि दृष्टमस्टाईल खुनाचा उलगडा झाला. समीर जाधव असे आरोपीचे नाव असून पेशाने तो फब्रिकेशनचे काम करतो. अंजली समीर जाधव असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ती खासगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. चारित्र्याच्या संशयातून तिचा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.(Pune Crime News)

Pune Crime News: पूर्वनियोजित कट करून बायकोचा संपवलं अन्

आरोपी फॅब्रिकेशन काम करतो. तो मूळचा अमरावतीचा रहिवासी आहे, तो पुण्यात शिवणे परिसरात आपल्या परिवारासह वास्तव्यास होता. 2017 ला या दोघांचे लग्न झाले होते, एक मुलगा एक मुलगी असे दोन मुले आहे…एक तिसरी आणि एक पाचवीमध्ये अशी मुलं शिकत आहेत, मुल दिवाळी सुट्टीमुळे गावाला गेली होती. आरोपीचे आणि एका महिलेचे अनैतिक संबंध होते, तरी त्याने बायकोवर आरोप केले. एका मित्राला बायकोच्या मोबाईलवर आय लव यु असा मेसेज करायला सांगितला, आणि त्यालाही आरोपीनेच रिप्लाय दिला. यावरून त्याने बायकोवरती संशय घ्यायला सुरूवात केली.

Pune Crime News: बायकोचा गळा दाबून खून; नंतर भट्टीत मृतदेह जाळला

खेड शिवापूर जवळ गोगलवाडी येथे एक गोडाऊन भाड्याने घेतले. 26 ऑक्टोबरला घेऊन चार चाकी गाडी घेऊन बायकोला गोडाऊन दाखवायला घेऊन गेला, त्याच ठिकाणी बायकोचा गळा दाबून खून केला, आणि त्या ठिकाणी भट्टी केली होती त्यात मृतदेह जाळला, त्याची राख जवळ असलेल्या वड्यात फेकून दिली. त्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी बायको मिसिंग झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही तपास केला असता त्यानेच हे केलं असल्याचे समोर आले.

Pune Crime News: पत्नी गायब झाल्याच्या दिवशीचे सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक तपास

मिसींगचा तपास करताना पोलिसानी सीसीटीव्ही आणि इतर माध्यमातून तपास केला असता. मिसींग दाखल झाल्यानंतर मिसींग महीलेचा तक्रारदार पती हा वारंवार पोलीस ठाण्यात येवून माझ्या पत्नीला कधी शोधणार असं म्हणत आत्मीयतेने चौकशी करत होता. त्यामुळे तक्रारदार पतीच्या हालचाली पोलिसांना काहीशा संशयास्पद वाटल्या, त्याची पत्नी गायब झाल्याच्या दिवशीचे सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक तपास करून पोलिसांनी गुन्हा उघड केला. आरोपी विरुध्द वारजे माळवाडी पोलीस गुन्हा दाखल करुन राजगड पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आलेला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.