आर्म ऍक्टच्या आरोपीला मिळतेय व्हीआयपी ट्रीटमेंट; पोलिसांनी हस्तगत केलेली पिस्तुल आरोपी पोलीस ठा


भंडारा क्राईम न्यूज : भंडारा गावात सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमावरून वाद (Bhandara Crime News) निर्माण झाल्याने भंडाऱ्याच्या तुमसर पंचायत समितीचे माजी उपसभापती शिशुपाल गौपाले यांनी एकावर पिस्टल ताणली होती. ही घटना 1 नोव्हेंबरला भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील आष्टी गावात घडली होती. याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी आरोपी शिशुपाल गौपाले याला पिस्टलसह अटक केली. मात्र, पोलिसांनी हस्तगत केलेली पिस्टल आरोपी पोलिसांसमोर पोलीस ठाण्यातच बिनदिक्कतपणे हाताळत असल्याचा आणि त्यानंतर गोबरवाही पोलीस ठाण्याच्या आवारात फिरत असल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पोलीस ठाण्यातच आरोपी पिस्टल हाताळत असतानाचा प्रकार गंभीर नाही का? पोलिसांनी या आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोपही आता नागरिकांकडून होतं आहे. युपी, बिहार सारखी परिस्थिती महाराष्ट्रातही घडत असल्याचा प्रत्यय गोबरवाही पोलीस ठाण्यात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या आरोपीच्या व्हिडीओवरून लक्षात येत आहे. या व्हिडीओमध्ये पोलिसांसमोरच हा आरोपी पिस्टल हाताळत असून ज्या अजय गहाणे नामक फिर्यादीनं त्याच्यावर गुन्हे दाखल केले तोच आरोपीसोबत रात्रभर पोलिस ठाण्यात झोपल्याचा आणि यासह विविध धक्कादायक खुलासे करीत आहेत. आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या गोबरवाही पोलिसांवर आता काय कारवाई होते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, पिस्टल कशी हाताळल्या जाते याचं प्रात्यक्षिक घेत असताना हा व्हिडीओ शूट करण्यात आला. मात्र, तो आता व्हायरल कसा झाला? याची चौकशी पोलीस विभाग करणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

ही बातमीही वाचा:

Crime News: लेस्बियन पार्टनरसाठी आपल्याच पाच महिन्यांच्या लेकराला आईनं संपवलं; फोटो, चॅट अन् फोन रेकॉर्डिंगवरुन भयंकर घटना आली समोर

आणखी वाचा

Comments are closed.