काँग्रेसला कमकुवत करण्यात शरद पवारांसह विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वाची, नाना पटोलेंचा आरोप
नाना पटोले शरद पवारांवर पार्थ पवारांच्या ( Parth Pawar) जमीन घोटाळ्याप्रकरणी नेमण्यात आलेली चौकशी समितीचा फार्स न करता मुख्यमंत्री फडणवींसमध्ये हिंमत असेल तर त्यांनी तुकाराम मुंढे (Tukaram Munde) यांच्या नेतृत्वात चौकशी समिती गठित करावी, अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला कमकुवत करण्यामागे शरद पवारांसह (Sharad Pawar) विरोधी पक्षांचींही भूमिका महत्त्वाची असल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.
महाराष्ट्रमध्ये जे काही आमच्या विरोधातील अलायन्समधील पक्ष आहेत, त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेसला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. पार्थ पवारांच्या 1800 कोटींच्या जमीन घोटाळ्यात औद्योगिक नवीन धोरण आणायचं आणि स्टॅम्प ड्युटी वाचवण्याचं धोरण ही पद्धत फक्त एक आहे. मुंबई आणि बीकेसी मधील 500 एकर पेक्षा अधिक जमीन, सिलिंकच्या बाजूची जमीन रस्ते विकास महामंडळाची जमीन ती कशी आणि काय भावाने दिली गेली? असा सवाल पटोलेंनी केला. महाराष्ट्र रोज लुटण्याचं काम सुरु, सर्वांनी एकत्रित लढाई लढली पाहिजे
नवी मुंबईचं मार्केट यार्ड होतं, ती जमीन मोदीजींच्या मित्रांना आयटी पार्कच्या नावानं देण्यात आली, असं असताना राज्याचे मुख्यमंत्री एकीकडे म्हणतात की ही गंभीर बाब आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्यात. त्याला चौकशी बसवण्याची गरज नाही, ते कागदावर आहे. शासन तुम्ही चालवत आहात, सरकार तुम्ही चालवत आहात. अशा वेळेस चौकशी बसवायची गरजच काय? असा सवाल पटोलेंनी केला. विकास खर्गेंच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमण्यात आली आहे. तुमच्यात खरोखरच हिंमत असेल आणि दूध का दूध पानी का पानी करायचं असेल तर, तुकाराम मुंडेंच्या अध्यक्षतेखाली कमिटी बसवा असे पटोले म्हणाले. या पद्धतीच्या चौकशीचा आणि कमिटीचा फार्स करुन जनतेची जी दिशाभूल चाललेली आहे आणि महाराष्ट्र रोज लुटण्याचं जे काम चाललेलं आहे, यावर मग शरद पवार साहेब असो की सर्वांनी एकत्रित लढाई लढली पाहिजे असेही पटोले म्हणाले.
काही ठिकाणी स्वबळावर होऊ शकते तर काही ठिकाणी एकत्र निवडणुका लढल्या जाऊ शकतात
शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आज दिवसा ढवळ्या विकल्या जात असेल, लुटला जात असेल याला कोणालाही शांत बसता येणार नाही. स्थानिक पातळीवर ज्या ज्या नेत्यांना जे जे निर्णय घ्यायचा आहे ते घेण्याचा अधिकार प्रदेश काँग्रेसने घेतलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कुठल्या महानगरपालिकेत, कुठल्या नगरपालिकेत, कुठल्या जिल्हा परिषद मध्ये, पंचायत समितीमध्ये काय लढायचा आहे ते स्थानिकांनी निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे काही ठिकाणी स्वबळावर होऊ शकते तर काही ठिकाणी अलायन्समध्येही निवडणुका लढल्या जाऊ शकतात, असे संकेत काँग्रेस नेते नाना पटेल यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या:
कोणी कोणाला धमकावलं तर त्याच्या घरात घुसून मारु, बंडखोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना नाना पटोलेंचा दम
आणखी वाचा
Comments are closed.