कार्तिकी वारीत विठ्ठल चरणी तब्बल 5 कोटी 18 लाखांचे दान, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मोठी वाढ
Kartiki Wari Pandharpur Denagi : नुकत्याच झालेल्या कार्तिकी वारीच्या कालावधीत वारकरी भाविक भक्तांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी भरभरून दान अर्पण केले आहे. एकूण 5 कोटी 18 लाख रुपयांचे उत्पन्न देवाच्या खजिन्यात जमा झाले आहे. यात्रा काळात सोन्या चांदीचे दागिने, लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे लेखाधिकारी मुकेश अनेचा यांनी दिली आहे.
कोणत्या माध्यमातून किती देणगी?
कार्तिकी शुध्द एकादशी म्हणजेच 22 ऑक्टोंबर ते कार्तिकी शुध्द पोर्णिमा म्हणजे 05 नोव्हेंबर या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ 48 लाख 8 हजार 289 रुपये, 1 कोटी 27 लाख 91 हजार 520 रुपये देणगी, 54 लाख 16 हजार 500 रुपये लाडू प्रसाद विक्री, 71 लाख 59 हजार 910 रुपये भक्तनिवास, 1 कोटी 77 लाख15 हजार 227 रुपये हुंडीपेटी, 50000 रूपये पुजा तसेच 33 लाख 36 हजार 876 रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून 6 लाख70 हजार 906 रुपये इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.
मागील यात्रेच्या तुलनेत तब्बल 1 कोटी 61 लाख 29 हजार 906 इतकी वाढ
मागील वर्षी श्रींच्या चरणाजवळ 41,41,314 रुपये अर्पण, 1,16,99,473 रुपये देणगी, 60,64,620 रुपये लाडू प्रसाद विक्री, 44,48,581 रुपये भक्तनिवास, 73,56,104 रुपये हुंडीपेटी, 10,72,681 रूपये पुजा , 5,04,015 रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून 4,60,534 रुपये उत्पन्न प्राप्त झाले होते. सन 2024 च्या कार्तिकी यात्रेत 3 कोटी 57 लाख 47 हजार 322 एवढे उत्पन्न मिळाले होते. यंदा यात्रा कमी भरुनही 5 कोटी18 लाख 77 हजार 228 रुपये इतके उत्पन्न जमा झाले आहे. मागील यात्रेच्या तुलनेत तब्बल 1 कोटी 61 लाख 29 हजार 906 इतकी वाढ झाली आहे.
आषाढी आणि कार्तिकी एकादशीला मोठ्या संख्येने वारकरी पंढरपुरात दाखल होतात
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा
Comments are closed.