…तर आमची शिवसेना शिंदे गटासह अजित दादांसोबत जाण्याची तयारी; जळगावमध्ये नव्या युतीची नांदी?


जळगाव वार्ता: भाजप (BJP) आमचा एक नंबर शत्रू असल्याने त्याला शह देण्यासाठी वेळ पडली तर आम्ही शिवसेना शिंदे (Shivsena) गटासह राष्ट्रवादी (NCP) अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीसोबतहे जायची आमची तयारी आहे. अशी भूमिका जळगावमध्ये (Jalgaon News) राष्ट्रवादी शरद पवार गटाने जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वी बीडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं वक्तव्य तेथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक नेत्याने केले होते. तर, आता कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये (Kolhapur) दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत. त्यापाठोपाठ आता गरज पडलीच तर आम्ही शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीसोबतहे जायची आमची तयारी असल्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

Gulabrao Patil : काही पथ्य हे पाळावे लागणार, मात्र कार्यकर्त्यांच मत आम्ही एकूण घेणार

राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच पक्ष स्वबळाची चाचपणी करत असून महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागावाटपाचे चित्र अस्पष्ट आहे. तर दुसरीकडे, नाशिकमध्ये महाविकास आघाडी आणि मनसे एकत्र पत्रकार परिषद घेणार असल्याने नव्या राजकीय समीकरणांची नांदी मानली जात आहे. अशातच आता जळगाव जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे सुतोघड्याळ जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी केलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या या भूमिके बाबत मंत्री  गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करताना म्हटल आहे की, आम्ही युतीमध्ये असल्याने आम्हाला युती सोबतच राहण्यासाठी काही पथ्य हे पाळावे लागणार आहे. मात्र कार्यकर्त्यांच मत आम्ही एकूण घेणार असल्याचं त्यांनी म्हटल आहे.

माणिकराव कोकाटे : ..तर अशा प्रकारचा प्रयोग आम्ही करू शकतो

राष्ट्रवादी शरद पवार गटाने आमच्या सोबत येऊन स्थानिक स्वराज निवडणुका लढविणे याबाबत अनुकूलता दाखविली असली तरी त्यांच्याकडे निवडून येणारे उमेदवार असतील तर अशा प्रकारचा प्रयोग आम्ही करू शकतो, मात्र या बाबतचा निर्णय आम्ही आमच्या वरिष्ठांच्या सोबत चर्चा करून घेऊ शकत असल्याचं मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी जळगावमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यातील 246 नगरपालिका निवडणुकांची (निवडणूक) तारीख जाहीर झाल्याने अखेर 9 वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे, कार्यकर्त्याची ही निवडणूक नव्या नेत्यांना संधी देणारी ठरणार आहे. मात्र, राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती एकत्र असल्याने स्थानिक स्तरावर वेगळीच गणितं पाहायला मिळत आहेत. बहुतांश पक्षनेतृत्वाने स्थानिक पातळीवर निर्णयघेण्याचे अधिकार संबंधित पक्षातील नेत्यांना दिले आहेत. त्यामुळे, पक्षांतर आणि स्वंतत्रपणे निवडणुका लढवण्याची तयारी दिसून येत आहे.

आणखी वाचा

Nashik Ward Reservation: नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी

आणखी वाचा

Comments are closed.