भाजपने लवकर स्थिती स्पष्ट करावी, अन्यथा…; नागपुरात भाजप वगळून उर्वरित महायुतीचा नवा प्रयोग?
नागपूर बातम्या : नागपुरात महायुतीत ऑल इज वेल नाही का? नागपुरात मोठा भाऊ असलेल्या भाजपच्या (BJP) भूमिकेमुळे महायुतीतील छोटे पक्ष भाजप वगळून वेगळी महायुती (Mahayuti) करण्याच्या तयारीत आहेत का?? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या पुढाकाराने आज नागपूरात महायुतीच्या भाजप वगळून उर्वरित पक्षांची म्हणजेच शिवसेना(Shivsena) , राष्ट्रवादी काँग्रेस(NCP), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) बहुजन रिपब्लिकन एकता मंच (BREM) आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी (PRP) ची बैठक होणार आहे. आम्हा सर्वच पक्षांना महायुती करायची आहे. मात्र भाजपने वेळीच आपले पत्ते खुले केले नाही, तर आमचीही तयारी झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्व 15 नगरपरिषद आणि 12 नगरपंचायतीमध्ये आमचे उमेदवार आणि त्यांचे बी फार्म तयार असल्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
Nagpur Politics : येत्या 14 तारखेपर्यंत भाजपने स्थिती स्पष्ट करावी, अन्यथा….
दरम्यान, येत्या 14 तारखेपर्यंत भाजपने स्थिती स्पष्ट करावी, अन्यथा महायुतीच्या स्वरूपात आम्ही भाजप वगळून तयारी करू, असे गंभीर राजकीय संकेतही शिवसेनेच्या नेत्यांनी दिले आहे. महायुती मधील या तणावासंदर्भात शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी या संदर्भात भाष्य करत आपली तयारी पूर्ण असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे नागपूरात्री महायुती भक्कम राहते ते काही वेगळा पर्याय बघायला मिळतो, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
Chandrapur: चंद्रपूर महानगरपालिकेच्या 66 जागांसाठी आरक्षण जाहीर,15 वर्तमान नगरसेवकांना फटका
चंद्रपूर महानगरपालिकेच्या 66 जागांसाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आलं. चंद्रपूर शहरातील प्रियदर्शनी सभागृहात पार पडलेल्या या सोडतीसाठी सर्वच पक्षातील राजकीय कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज जाहीर झालेल्या सोडतीत अनुसूचित जातीसाठी 13, अनुसूचित जमातीसाठी 5 आणि इतर मागास प्रवर्गासाठी 17 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. आज जाहीर झालेल्या आरक्षणाचा किमान 15 वर्तमान नगरसेवकांना फटका बसलाय.
वर्ध्यात ग्रामीण भागात पोलिसांची वॉश आउट मोहीम; दारूभट्ट्या उध्वस्त करीत लाखोचा मुद्देमाल केला नष्ट
स्थानिक निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर दारूबंदी असणाऱ्या वर्ध्यात पोलिसांकडून वॉश आउट मोहीम राबविण्यात आलीय. मांडवगड, बरबडी, गणेशपूर, पांढरकवडा, शिखबेडा या परिसरात वॉश आउट मोहीम राबवून दारू भट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या. तब्बल साठ लाखाचा मुद्देमाल नष्ट करण्यात आलाय. वर्धासावंगी मेघे, समुद्रपूर आणि सेवाग्राम पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही धडक कारवाई करण्यात आली आहे. सध्या नगर परिषद निवडणुका होऊ घातल्या आहेय. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरात देखील दारूबंदी कारवाई करण्याची मागणी मात्र जोर धरते आहेय.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.