काँग्रेस नेत्याचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी अंत, मुंबईहून चिखलीकडे परतताना काळाचा घाला; र


काँग्रेसचे सत्येंद्र भुसारी : चिखली तालुका काँग्रेस (Congress) कमिटीचे माजी तालुका अध्यक्ष, बाजार समितीचे माजी सभापती तसेच पैठण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रभारी डॉ. सत्येंद्र भुसारी (Satyendra Bhusari) यांचा 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास कासारा रेल्वे स्टेशनवर (Kasara Railway Station) झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेची बातमी समजताच चिखली तालुक्यात शोककळा पसरली आहे.

मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सामाजिक कार्याची सुरुवात करून समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्यानंतर डॉ. भुसारी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. नुकतीच काँग्रेस पक्षाने त्यांची पैठण विधानसभा मतदारसंघ निरीक्षक म्हणून निवड केली होती. पक्षाच्या मुंबई येथील बैठकीसाठी ते प्रवास करत होते, अशी माहिती मिळाली आहे.

Satyendra Bhusari: धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईवरून चिखलीकडे परतत असताना कसारा घाटात धावत्या रेल्वेतून पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तात्काळ नाशिकमधील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. ज्या रेल्वेगाडीतून हा अपघात झाला ती गाडी कासारा स्टेशनवर थांबत नव्हती. नेमका अपघात कसा झाला याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Satyendra Bhusari: चिखली तालुक्यावर शोककळा

घटनेची माहिती मिळताच माजी आमदार राहुल बोंद्रे हे मुंबईहून घटनास्थळी रवाना झाले. उदयनगरचे सरपंच मनोज लाहुडकर देखील मुंबईत असताना तत्काळ त्या ठिकाणी पोहोचले. चिखलीच्या आमदार श्वेता महाले-पाटील यांचे पती विद्याधर महाले यांनीही स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून आवश्यक मदत करण्याच्या सूचना दिल्या. डॉ. भुसारी यांच्या निधनाने चिखली तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Buldhana News: 53 वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

दरम्यान, सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी शिवारातील ताडशिवणी गावाजवळ एका 53 वर्षीय शेतकऱ्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. रामकिशन विश्वनाथ शितोळे असे या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव असून फक्त शेतीवरच त्याची उपजीविका चालत असे. गेल्या अनेक वर्षांपासून कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे या शेतकऱ्याला संकटाला सामोरे जाव लागत होतं. अखेर कंटाळून या शेतकऱ्याने काल सायंकाळी आपल्याच शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

आणखी वाचा

Delhi Bomb Blast: दिल्ली बॉम्बस्फोटाचा भयानक व्हिडीओ अखेर समोर आला, त्या क्षणी नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.